AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारचा मोठा निर्णय : पीएलआय योजनेतून 10 क्षेत्रांना 2 लाख कोटींचे पॅकेज

सरकारने देशातील 10 क्षेत्रातील उद्योगांना पीएलआय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने उद्योगांसाठी 2 लाख कोटींचे नवे पॅकेज जाहीर केले आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय : पीएलआय योजनेतून 10 क्षेत्रांना 2 लाख कोटींचे पॅकेज
| Updated on: Nov 11, 2020 | 9:53 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे देशातील उद्योगधंद्यांना मरगळ आली आहे. देशात गुंतवणूकदार वाढावेत आणि देशातील उद्यागांना उभारी मिळावी म्हणून मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने देशातील 10 क्षेत्रातील उद्योगांना पीएलआय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने उद्योगांसाठी 2 लाख कोटींचे नवे पॅकेज जाहीर केले आहे. (The government has announced package of Rs 2 lakh crore for industries)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय जाहीर करताना ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण 10 सेक्टरमधील उद्योगांना पीएलआय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. पीएलआय योजनेचा लाभ रेफ्रिजीरेटर, वाशिंग मशीन, औषधी, वाहन, दूरसंचार, कपडे, खाद्यपदार्थांचे उत्पादन, मोबाईल फोनची बॅटरी अशा उद्योगांत गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना मिळेल.

निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या योजनेमुळे वेगवेगळ्या उत्पादनांच्या निर्मात्यांना प्रोत्साहन देईल. देशाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाण्यास या योजनेचा लाभ होईल. या योजनेमुळे देशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या उद्योगांना या योजनेचा चांगला लाभ मिळेल.

या क्षेत्रातील उद्योगांना लाभ

सीतारामन यांनी सांगितल्या प्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान उत्पादन उद्योग- 5 हजार कोटी, वाहन तसेच वाहनांचे सुटे भाग बनवणारे उद्योग- 57 हजार 42 कोटी, औषधी- 15 हजार कोटी, दुरसंचार आणि नेटवर्कींग संबंधित उत्पादन घेणारे उद्योग- 12 हजार 195 कोटी, वस्त्रोद्योग- 10 हजार 683 कोटी, खाद्य उत्पादन-10 हजार 900 कोटी, फ्रिज, वाशिंग मशीन- 6 हजार 238 अशा स्वरुपाचे पॅकेज पीएलआयच्या माध्यमातून मिळेल.

पीएलआय म्हणजे काय?

देशातील उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या वर्षीच्या मार्च महिन्यात पीएलआय योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार देशातली उद्योगांच्या उत्पादनांची विक्री जास्त व्हावी म्हणून सरकारकडून प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिली जाते. विदेशी उद्योगधंदे भारताकडे आकर्षित व्हावेत हा देखील उद्देश पीएलआय या योजनेमागे आहे. पीएलआयमुळे निर्मिती क्षेत्रातील उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

संबंधित बातम्या :

जनधन खात्याला आधारशी करा लिंक, अन्यथा नाही मिळणार 2.30 लाखांचा फायदा

अमेरिका आणि कोरोना लसमुळे शेअर बाजारात उसळी, गुंतवणूकदारांनी कमावले 8.80 लाख कोटी रुपये

पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100 रुपये गुंतवून बना लखपती; जाणून घ्या, कशी करणार सुरुवात

(The government has announced package of Rs 2 lakh crore for industries)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.