आता मोबाईल रिचार्ज करताच मिळेल Health Insurance, वाचा कंपनीचा खास प्लॅन

Vi ने 51 रुपये आणि 301 रुपयांच्या रिचार्जवर इंडस्ट्रीचा पहिला Vi Hospicare लॉन्च केला आहे. यामध्ये प्रीपेड ग्राहकांना आरोग्य विमा कव्हर मिळत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:49 AM, 3 Mar 2021
आता मोबाईल रिचार्ज करताच मिळेल Health Insurance, वाचा कंपनीचा खास प्लॅन
हेल्थ इन्शुरन्स काढताय, तर ही माहिती जाणून घ्या

मुंबई : व्होडाफोन आयडिया (Vi) च्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. कारण आता मोबाईल रिचार्जवर आरोग्य विमा लाभ देण्यासाठी दूरसंचार कंपनी व्हीआयने आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सशी (Aditya Birla Health Insurance) करार केला आहे. Vi ने 51 रुपये आणि 301 रुपयांच्या रिचार्जवर इंडस्ट्रीचा पहिला Vi Hospicare लॉन्च केला आहे. यामध्ये प्रीपेड ग्राहकांना आरोग्य विमा कव्हर मिळत आहे. व्हीआय ग्राहकांना 24 तासांच्या कालावधीत रूग्णालयात भरतीसाठी 1000 रुपयांपर्यंतचे निश्चित कव्हर मिळते. यासह आयसीयू खर्चासाठी 2 हजार रुपयांचा कव्हरदेखील उपलब्ध होणार आहे. (to get health insurance vodafone idea subscribers benefit on mobile recharges)

‘Vi Hospicare’ व्होडाफोन आयडियाच्या प्रीपेड ग्राहकांना हॉस्पिटलायझेशन कव्हर मिळतो. ऑफरमध्ये कोव्हिड 19 किंवा कोणत्याही आजारामुळे हॉस्पिटलायझेशनचा समावेश करण्यात आला आहे. Vi Hospicare 18 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांसाठी आहे. 51 किंवा 301 रुपयांचे प्रत्येक रिचार्ज 28 दिवसांपर्यंत असेल.

Vi Hospicare त्या खास गोष्टी

– 51 रुपयांच्या रिचार्जवर यूजर्सला 500 SMS मोफत मिळतील. याची व्हॅलिटीडी 28 दिवसांची असेल.

– यामध्ये 1000 रुपयांचा हेल्थ बेनेफिट मिळेल.

– 301 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल, रोज 1.5GB डेटा, 2GB अतिरिक्त आणि रोज 100 SMS बेनेफिट मिळेल. त्याची वैधता देखील 30 दिवसांची असेल.

– ICU मध्ये भरती झाल्यास ग्राहकांना दिवसाला 2 हजार रुपयांचा लाभ मिळेल.

– अपघात झाल्यास प्रतीक्षा कालावधी लागू नाही.

– काही रोगांमध्ये 2 वर्षाची प्रतीक्षा कालावधी लागू नाही.

Hospicare वर व्हीआय सीएमओ अवनीश खोसला म्हणाले की, “एक अब्जाहून अधिक भारतीय मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी आम्ही परवडणारे उपाय आणण्यावर आमचा भर आहे.” आरोग्य आणि निरोगीपणा हा एक महत्वाचा केंद्रबिंदू आहे. यामुळे आम्ही एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. (to get health insurance vodafone idea subscribers benefit on mobile recharges)

संबंधित बातम्या – 

SBI मध्ये खरेदी करा स्वस्तात गाड्या, घर आणि दुकान; वाचा संपूर्ण प्रोसेस

Gold Rate Down: सॉवरेन गोल्ड बाँड खरेदी करणं उपयुक्त आहे की गोल्ड ईटीएफ?, जाणून घ्या

नोकरदारांना अच्छे दिन येणार? EPFO च्या बैठकीत मोठ्या निर्णयाची शक्यता

(to get health insurance vodafone idea subscribers benefit on mobile recharges)