Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk याचे घुमजाव; भारताचा दौराच केला रद्द, इलेक्ट्रिक कारची एंट्री आता कधी होणार?

Elon Musk याने भारत दौरा अचानक रद्द केल्याने उद्योग जगतात उलटसुलट चर्चा सुरु आहे त्यामुळे Tesla या इलेक्ट्रिक कारची भारतातील एंट्री लांबणीवर पडली तर नाही ना, अशी शंका पण उपस्थित करण्यात येत आहे. मस्क भारतासह दक्षिण आशियात व्यवसाय वाढविण्याच्या तयारीत आहे.

Elon Musk याचे घुमजाव; भारताचा दौराच केला रद्द, इलेक्ट्रिक कारची एंट्री आता कधी होणार?
एलॉन मस्क याचा दौरा रद्द
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 1:58 PM

Tesla चा सीईओ एलॉन मस्क याने भारत दौरा अचानक रद्द केला. टेस्ला या इलेक्ट्रिक कारसाठी तो भारतात येणार होता. त्याने गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट घेतली होती. भारतात टेस्लाला सरकारकडून काही सुविधा आणि सवलती हव्या आहेत. पण अटी आणि शर्तींशिवाय सवलत देण्यास केंद्राने नकार दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याचा दौरा महत्वाचा मानल्या जात होता. पण भारतात सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरु आहे. त्याचवेळी त्याने दौरा रद्द केल्याने चर्चा सुरु झाली आहे.

हे दिले कारण

एलॉन मस्कने एक्स प्लॅटफॉर्मवर त्याने दौरा का रद्द केला याची माहिती दिली आहे. जागतिक वृत्तसंस्था Reuters ने पण याविषयी एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, एलॉन मस्क भारतात सध्या येणार नाही. 23 एप्रिल रोजी टेस्लाचे तिमाही निकाल समोर येत आहे. यविषयीची माहिती देण्यासाठी त्याने हा दौरा रद्द केला आहे. मस्क हा 21-22 एप्रिल रोजी भारत भेटीवर येणार होती. एलॉन मस्क याने ट्वीट करुन भारत दौरा पुढे ढकलल्याची माहिती दिली. दुर्दैवाने मला भारत दौरा पुढे ढकलावा लागत असल्याचे मस्क याने पोस्टमध्ये लिहिले आहे. पण या वर्षाअखेर आपण भारत दौऱ्यावर नक्की येऊ असे त्याने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान मोदींशी होणार होती भेट

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एलॉन मस्क सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होता. त्यानंतर तो टेस्लाच्या भारतातील प्रवेशाविषयीची घोषणा करणार होता. पण आता ही योजना रद्द झाली आहे. या 10 एप्रिल रोजी मस्क याने स्वतः एक्सवर पोस्ट करुन नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेण्यास उत्सूक असल्याचे म्हटले होते. मस्क दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत होता. यावेळी पंतप्रधानांशी भेट, स्टार्टअप्स आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गजांच्या भेटीचा कार्यक्रम ठरला होता.

पुण्यात कंपनीचे ऑफिस

भारतात इलेक्ट्रिक वाहन बाजारात प्रवेशासाठी टेस्लाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यात कार्यालयासाठी जागा शोधली. पंचशील बिझनेस पार्कमध्ये कार्यालय (Elon Musk Tesla Office) भाडे तत्वावर घेतले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांशी चर्चेनंतर टेस्लाने हे पाऊल टाकले. कंपनीच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक कार विक्रीबाबत टेस्ला आग्रही असल्याचे स्पष्ट होते.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.