AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याचे भाव आणखी वाढणार..? आकडा झटका देणारा, सराफा बाजारातून आली मोठी बातमी!

सोन्याचे भाव वाढणार असल्याने ग्राहकांचे टेन्शन वाढले आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतरही सोन्याच्या दरात मोठी उसळी दिसली. आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 13 हजार रुपयांपर्यंत वाढणार असल्याची माहिती सराफा बाजारातून आली आहे.

सोन्याचे भाव आणखी वाढणार..? आकडा झटका देणारा, सराफा बाजारातून आली मोठी बातमी!
jewelleryImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2026 | 4:48 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना एक वर्षभर सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनावर देशातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अजूनही लोक सोनं खरेदी करत आहेत. तर पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अचानक सोन्याच्या भावात उसळी आली आहे. येत्या काही दिवसात सोन्याच्या भावात प्रचंड वाढ होणार असल्याचं सराफा बाजारातील व्यापारी सांगत आहे. म्हणजेच सोनं आणखी महाग होणार आहे. आजपासूनही सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. ही झळ प्रचंड मोठी असेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सोन्याच्या दरांवर भाष्य केलं आहे. सोन्याच्या आयात शुल्कात वाढ झाल्याने आजपासून सोनं प्रति 10 ग्रॅम 13 हजार रुपयांपर्यंत सोन्याचे भाव वाढणार आहेत. सोने- चांदीवरील आयातशुल्कात मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर होणार आहे. आज बाजारपेठेत सोनं 12 ते 13 लाख प्रती किलोने महागणार आहे, असं राजेश रोकडे यांनी सांगितलं. आज जर सोन्याचे भाव एवढ्या प्रमाणात वााढणार असतील तर येणाऱ्या काळात सोन्याचा आकडा हा झटका देणाराच ठरेल, असं सांगितलं जात आहे.

मोदींना भेटणार

या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला देशातली प्रमुख व्यापारी उपस्थित होते. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलनं पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली आहे. सोन्याचं आयात शुल्क 5 टक्क्यांवरुन 10 टक्के झालं आहे, ॲग्रीकल्चर सेस 1 टक्क्यांवरून 5 टक्के झाले आहे, ड्युटी 15 टक्के झाली आहे, सर्व मिळून 18 टक्के कर वाढला आहे. पूर्वी प्रति किलो साडेतेरा लाख रुपये कर लागायचा. आता तो 27 लाख रुपये कर भरावा लागत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

नागपुरात सोनं महागलं

दरम्यान, नागपुरात सोन्याच्या दर 1 लाख 61 हजार 509 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात 7900 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली आहे. आयात शुल्कात वाढ केल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 30 हजार रुपयांची वाढ झाली आहे. दर वाढल्याने काही ज्वेलर्सकडे ग्राहकांचा कमी प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून दुसरीकडे दुकानातील ग्राहकांची संख्याही रोडावली आहे.

Follow Us
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...