Year Ender | सरकारी कंपन्यांनी केले मालामाल, 17 PSU स्टॉकने दिला डबल परतावा

Year Ender | या वर्षात शेअर बाजाराने नवनवीन उच्चांक गाठले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सराकरी कंपन्या कमाल दाखवतील असा शब्द दिला होता. त्यांचा हा शब्द या कंपन्यांनी खरा करुन दाखवला. या कंपन्यांनी शेअर बाजारात कमाल दाखवली. त्यांनी गुंतवणूकदारांना डबल कमाई करुन दिली.

Year Ender | सरकारी कंपन्यांनी केले मालामाल, 17 PSU स्टॉकने दिला डबल परतावा
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 5:04 PM

नवी दिल्ली | 29 डिसेंबर 2023 : वर्ष 2023 हे शेअर बाजारासाठी जोरदार ठरले. या वर्षात मुख्य भारतीय शेअर बाजारांनी सातत्याने नवनवीन उच्चांक गाठले. सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वकालीन उच्चांकी कामगिरी केली. या महिन्यात तर दोन्ही निर्देशांकांनी कमाल केली. त्यांनी उच्चांकी झेप घेतली. त्यात सरकारी कंपन्यांनी मोठी कमाल दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना उत्तर देताना सरकारी कंपन्या लवकरच यशोगाथा रचतील असा शब्द दिला होता. हा शब्द या कंपन्यांनी खरा करुन दाखवला. त्यांचा आलेख उंचावला. त्यांनी गुंतवणूकदारांना डबल फायदा मिळवून दिला.

शेअर बाजारात तेजीचे सत्र

आज या वर्षातील शेवटचे व्यापारी सत्र होते. 2023 मधील शेवटच्या ट्रेडिंग डे रोजी बाजार थोडा मंदावला. पण त्यात मोठी रॅली दिसून आली. यावर्षी सेन्सेक्स 18 टक्क्यांनी मजबूत होता. पहिल्यांदाच त्याने 72 हजार अंकाचा टप्पा गाठला. तर एनएसईचा निफ्टी50 जवळपास 20 टक्के उसळला. तो 22 हजार अंकांच्या जवळपास पोहचला.

हे सुद्धा वाचा

पीएसयु शेअर्समध्ये तेजीचे सत्र

शेअर बाजारातील तेजीच्या सत्राने कमाल केली. अनेक शेअर मल्टिबॅगर ठरले. या वर्षी सरकारी कंपन्यांच्या शेअरने पण कमाल दाखवली. सार्वजनिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी दमदार कामगिरी बजावली. या शेअर्सने बाजारात तेजीचे सत्र आणल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षात एक डझनहून अधिक सरकारी कंपन्यांनी मल्टिबॅगर रिटर्न दिला. तर काहींनी दुप्पट कमाई करुन दिली.

या 3 पीएसयू स्टॉकचा धमाका

28 डिसेंबरपर्यंतचे आकडे समोर आले. त्यानुसार, दोन सरकारी शेअरने यंदा 250-250 टक्के तेजी गाठली. 252 टक्क्यांनी आरईसी या शेअरने तेजी नोंदवली. तर 241 टक्क्यांची उसळी घेत पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आयआरएफसीच्या शेअरने 197 टक्क्यांची आघाडी घेतली आहे. 2023 मध्ये या तीन शेअरने तिप्पट कमाई करुन दिली.

हे शेअर 150-200 टक्क्यांनी आघाडीवर

2023 मध्ये मझगांव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर 195 टक्क्यांनी वधारला. तर एनएलसी इंडियाचा शेअर 193 टक्क्यांनी वधारला. आयटीआय लिमिटेड, इरकॉन इंटरनॅशनल, एसजेव्हीएन, रेल विकास निगम लिमिटेड आणि कोचीन शिपयार्ड या शेअर्सचा भाव 154 ते 190 टक्के तेजी दिसून आली. तर मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, हिंदुस्तान एयरोनॉटिक्स, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हिंदुस्थान कॉपर, इंजिनिअर्स इंडिया आणि एनबीसीसीचे शेअर पण मल्टिबॅगर ठरले.

Non Stop LIVE Update
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.