Year Ender | यावर्षात Share Market ने केले मालामाल; 280 शेअर ठरले मल्टिबॅगर

Year Ender | वर्ष 2023 मध्ये शेअर बाजारात अनेक गुंतवणूकदारांना कमाईची संधी मिळाली. बाजारात हजारो कंपन्या आहेत. त्यातील 280 कंपन्या महारथी निघाल्या. या कंपन्या मल्टिबॅगर ठरल्या. तर आतापर्यंत शेअर बाजारात 82 टक्के शेअर्सने काहीना काही परतावा दिला. बाजारात चढउतार होत असला तरी गुंतवणूकदारांना मालामाल केले.

Year Ender | यावर्षात Share Market ने केले मालामाल; 280 शेअर ठरले मल्टिबॅगर
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 5:09 PM

नवी दिल्ली | 21 डिसेंबर 2023 : वर्ष 2023 मध्ये शेअर बाजारने कमाल दाखवली. शेअर बाजाराने उच्चांकी विक्रम नावावर नोंदवले. शेअर बाजाराची घौडदौड सुरु आहे. हे वर्ष संपण्यात आहे. आता केवळ एक आठवड्याचे व्यापारी सत्र उरले आहे. हे कॅलेंडर वर्ष शेअर बाजारासाठी महत्वपूर्ण ठरले आहे. शेअर बाजारात चढउतार होतात. पण गुंतवणूकदारांना या वर्षात मालामाल होता आले. अनेक शेअर्स मल्टिबॅगर ठरले. या कालावधीत 82 टक्के शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. निफ्टी, मुंबई स्टॉक एक्सचेंजमधील शेअर्सनी कमाल केली. काहींनी तर छप्परफाड कमाई करुन दिली.

निफ्टीतील प्रमुख निर्देशांकात तेजी

बिझनेस टुडेतील एका अहवालानुसार, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर यावर्षी 19 डिसेंबरपर्यंत 82 टक्के शेअर्संनी गुंतवणूकदारांना अनुकूल परतावा दिला. त्यामुळे एनएसईमध्ये तेजीचे सत्र दिसले. 19 डिसेंबरपर्यंत एनएसई निफ्टी 50.18 टक्के मजबूत दिसला. तर निफ्टी स्मॉलकॅप 250 मध्ये 46 टक्के आणि निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्समध्ये 42 टक्क्यांची तेजी दिसून आली.

हे सुद्धा वाचा

सर्वाधिक तेजी या शेअरमध्ये

शेअर बाजारात काही खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावली. यावर्षात 19 डिसेंबरपर्यंत विचार करता, सर्वाधिक सूसाट कामगिरी जय बालाजी इंडस्ट्रीजची ठरली. हा शेअर 1,291 टक्क्यांनी उसळला. या वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर 54.70 रुपयांवर होता. तर आता हा शेअर 761.05 रुपयांवर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एसअँडएस पॉवर स्विचगिअर हा शेअर आहे. त्याने या वर्षात 616 टक्क्यांची भरारी घेतली. तर तिसऱ्या क्रमांकावर जीके वायर्सचा क्रमांक आहे. हा शेअर 544 टक्क्यांनी वधारला.

500 टक्क्यांची दमदार कामगिरी

ऑरिनप्रो सॉल्युशन्सच्या शेअर्सचे भाव 500 टक्क्यांनी वधारले. हा शेअर 501 टक्के वाढीसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर आयनॉक्स विंड एनर्जीने 398 टक्क्यांची झेप घेत पाचवा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर 384 टक्क्यांसह सर्वोटेक पॉवर सिस्टम्स, 371 टक्क्यांसह थॉमस स्कॉट (इंडिया), 369 टक्क्यांसह टीटागड रेलसिस्टम्स, 363 टक्क्यांसह जेआयटीएफ इंफ्रालॉजिस्टिक्स, 351 टक्क्यांवर आशापुरा मिनेकेम आणि 395 टक्क्यांचा परतावा ईम्को एलीकॉनने (इंडिया) दिला आहे.

हे शेअर पण नाहीत मागे

19 डिसेंबर रोजी एनएसई रोजी 267 शेअर्सनी पण कमाल दाखवली. या शेअर्सने कमीत कमी 100 टक्क्यांची तेजी नोंदवली. म्हणजे आतापर्यंत एकूण 280 शेअर मल्टिबॅगर ठरले आहेत. या शेअरमध्ये प्रामुख्याने बीएसई, जिंदल सॉ, एचबीएल पॉवर सिस्टम्स, जेन टेक्नोलॉजीज, यूनिटेक, जीई टीअँडडी इंडिया, अपोलो मायक्रो सिस्टम्स, न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स, न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीज, एशियन एनर्जी सर्व्हिसेज, प्रीमिअर एक्सप्लोसिव्स, पेनिनसुला लँड, एस्सार शिपिंग, आयनॉक्स विंड, इलेक्ट्रोथर्म (इंडिया), आरईसी , पटेल इंजीनियरिंग, कायन्स टेक्नोलॉजी इंडिया, आनंद राठी वेल्थ, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, एसपीएमएल इंफ्रा, ज्यूपिटर वैगन्स, इंडो टेक ट्रांसफॉर्मर्स आणि सुजलॉन एनर्जी यांचा समावेश आहे. या शेअर्सने 250 ते 350 टक्क्यांचा परतावा दिला.

Non Stop LIVE Update
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.