MPSC चा विद्यार्थ्यांसाठी ॲलर्ट, राज्यसेवा, वनसेवेसेह अभियांत्रिकी परीक्षेतील पदांचा प्राधान्यक्रम नोंदवण्याचं आवाहन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 413 पदांसाठी मागवलेल्या प्राधान्यक्रम नोंदवण्याच्या कार्यक्रमाची मुदत वाढवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांसदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवण्यास दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

MPSC चा विद्यार्थ्यांसाठी ॲलर्ट, राज्यसेवा, वनसेवेसेह अभियांत्रिकी परीक्षेतील पदांचा प्राधान्यक्रम नोंदवण्याचं आवाहन
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 11:18 AM

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 413 पदांसाठी मागवलेल्या प्राधान्यक्रम नोंदवण्याच्या कार्यक्रमाची मुदत वाढवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांसदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवण्यास दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. दुसरीकडे राज्य सेवा परीक्षा 2019 च्या मुलाखतींच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांच्या नावासह यादी आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलीय.

दोन दिवसांची मुदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम आयोगाला कळवण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आलीय. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 व राज्य सेवा मुख्य परीक्षा या परीक्षांतील पदांचा प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांना नोंदवावा लागणार आहे.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 आणि महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 या दोन परीक्षांमधील पदांसाठी 19 ऑग्सटपर्यंत तर राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 साठी 23 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयोग लवकरच निकाल जाहीर करणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी त्यांचा प्राधान्यक्रम आयोगाला कळवल्यानंतर आयोग लवकरच निकाल जाहीर करणार आहे. आयोगानं परिपत्रक काढून त्यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुलाखतींचं वेळापत्रक जाहीर

लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. लोकसेवा आयोगाकडे मुलाखत घेण्यासाठी स्टाफ कमी असल्यानं आणि कोरोना विषाणू संसर्गामुळे मुलाखतींचा कार्यक्रम रखडला होता. मात्र, 25 ऑगस्टपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहण्याबाबत कार्यक्रम जाहीर केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांची या अधिसूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (496 पदे), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा (1 हजार 145 पदे), महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा परीक्षा (435 पदे), महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (100 पदे), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा (16 पदे) याप्रमाणे एकूण 2 हजार 192 पदांसाठी एकूण 6 हजार 998 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत. त्यापैकी 377 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून उर्वरित 6 हजार 621 उमेदवारांच्या मुलाखती होणे बाकी आहे. आता या सदस्य नियुक्तीमुळे या भरतीप्रक्रियेला वेग येणार असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे, असं दत्तात्रय भरणे म्हणाले होते.

इतर बातम्या:

गाडीतून ऑईल गळती, लहान मुलाने गंडवलं, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने 50 लाखांची लूट टळली

Bank Holidays in August 2021 : उद्यापासून 5 दिवस बँका बंद, आजच महत्त्वाची कामं उरका, बँकेत जाण्यापूर्वी ही यादी नक्की पाहा

Maharashtra Public Service Commission issue circular for preference registration for various exams

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.