Government Internship : राज्यसभा सचिवालयात इंटर्नशिप आणि फेलोशिप मिळविण्याची संधी, लवकर करा अप्लाय

अधिसूचनेनुसार, पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएचडीधारकांना इंटर्नशिपची संधी मिळेल. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 31 मार्चपूर्वी अर्ज करता येतील. (opportunity to get Internship and Fellowship in Rajya Sabha Secretariat, Apply early)

Government Internship : राज्यसभा सचिवालयात इंटर्नशिप आणि फेलोशिप मिळविण्याची संधी, लवकर करा अप्लाय
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 3:46 PM

नवी दिल्ली : सरकारी इंटर्नशिप आणि फेलोशिपच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंटर्नशिप आणि फेलोशिपसाठी भारतीय संसदेच्या राज्यसभा सचिवालयानं अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएचडीधारकांना इंटर्नशिपची संधी मिळेल. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 31 मार्चपूर्वी अर्ज करता येतील. (opportunity to get Internship and Fellowship in Rajya Sabha Secretariat, Apply early)

राज्यसभेच्या कामकाजात रुची असणार्‍या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इंटर्नशिपसाठी राज्यसभा संशोधन व अभ्यास (आरएसआरएस) योजनेअंतर्गत डॉ. एस. राधाकृष्णन पीठ, राज्यसभा फेलोशिप्स आणि राज्यसभा विद्यार्थी संलग्नता इंटर्नशिपच्या वतीने हे जारी करण्यात आले आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, फेलोशिपच्या 4 आणि इंटर्नशिपच्या 10 पदांवर भरती केली जाईल.

कोण करु शकते अर्ज?

राज्यसभा सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतली पाहिजे. त्याचबरोबर, फेलोशिपसाठी, उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पीएचडी असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करणारे उमेदवार वयाच्या 65 वर्षांपेक्षा जास्त नसावेत.

इंटर्नशिप ऑफर

राज्यसभा सचिवालयात इंटर्नशिपच्या या ऑफर अंतर्गत एकूण 10 उमेदवारांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. यात निवड झालेल्या उमेदवारांना दोन महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी मिळेल. या इंटर्नशिप कालावधीत उमेदवारांना दरमहा 10,000 रुपये मिळतील.

फेलोशिप ऑफर

फेलोशिप योजनेसाठी 4 उमेदवारांची निवड केली जाईल. यात निवड झालेल्या उमेदवारांना 18 महिन्यांसाठी फेलोशिप मिळेल. त्याचा कालावधी 6 महिने आणि यापेक्षा अधिक असू शकतो. यात अनुदान म्हणून तुम्हाला 8 लाख रुपये आणि 50 हजार रुपये मिळतील. या ऑफरचा तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन संबंधित लिंकवर क्लिक करा.

असे करा अप्लाय

राज्यसभा संशोधन व अभ्यास (आरएसआरएस) योजनेने जाहीर केलेल्या या इंटर्नशिप ऑफरसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी थेट मेलद्वारे अर्ज केले जाऊ शकते. यासाठी प्रथम अधिकृत वेबसाईट rajyasabha.nic.in वर जा. मुख्यपृष्ठावरील ताज्या बातम्या फोल्डरवर जा. आता ‘राज्यसभा संशोधन व अभ्यास (आरएसआरएस) योजने’च्या दुव्यावर क्लिक करा. ‘राज्यसभा संशोधन व अभ्यास (आरएसआरएस)’ योजनेच्या लिंकवर क्लिक करा. आता अर्जाचा पीडीएफ फॉर्म येईल, डाऊनलोड करा.

अर्ज प्रक्रिया

या ऑफरमध्ये अर्ज करण्यासाठी, अर्ज योग्यरीत्या भरा. अर्जासह जोडलेली कागदपत्रे ईमेल आयडीवर पाठवावी लागतील. इंटर्नशिपसाठी rssei.rsrs@sansad.nic.in वर आणि फेलोशिपसाठी rksahoo.rs@sansad.nic.in या ईमेल आयडीवर मेल करा. (opportunity to get Internship and Fellowship in Rajya Sabha Secretariat, Apply early)

इतर बातम्या

हिंदू मुलाचं मुस्लिम मुलीशी लग्न, धर्मांतर होईपर्यंत विवाह अमान्य; कोर्टाचा निर्णय

आधी सेक्स चॅट, मग न्यूड व्हिडीओ कॉल, तुम्हीही ‘अशाप्रकारे’ ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकू शकता

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.