AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू मुलाचं मुस्लिम मुलीशी लग्न, धर्मांतर होईपर्यंत विवाह अमान्य; कोर्टाचा निर्णय

पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. (Marriage Of Muslim Woman With Hindu Man Not Valid, Says High Court)

हिंदू मुलाचं मुस्लिम मुलीशी लग्न, धर्मांतर होईपर्यंत विवाह अमान्य; कोर्टाचा निर्णय
marriage
| Updated on: Mar 13, 2021 | 3:41 PM
Share

चंदीगड: पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी विवाह केला असला तरी मुलीने धर्मांतर केल्याशिवाय हा विवाह वैध ठरणार नाही. विवाह वैध ठरवण्यासाठी मुलीला धर्मांतर करावे लागेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. मात्र, दोघेही सहमतीने एकत्र राहू शकतात, असंही कोर्टाने म्हटलं आहे. (Marriage Of Muslim Woman With Hindu Man Not Valid, Says High Court)

एका 18 वर्षीय मुस्लिम तरुणी आणि 25 वर्षीय हिंदू तरुणाच्या याचिकेवर पंजाब-हरियाणा कोर्टात सुनावणी सुरू होती. यावेळी हा निर्णय देण्यात आला. या दोघांनीही नुकतंच हिंदू मंदिरात लग्न केलं आहे. मात्र, मुलीने हिंदू धर्म स्वीकारल्याशिवाय हा विवाह मान्य होणार नाही. परंतु, दोघंही वयस्क असल्याने सहमतीने राहू शकतात, असं कोर्टाने म्हटलं आहे.

संरक्षण पुरवण्याचे आदेश

15 जानेवारी रोजी एका शिव मंदिरात दोघांनीही हिंदू पद्धतीने विवाह केला होता. या विवाहानंतर दोन्ही कुटुंबाकडून धमकी मिळाल्याने त्यांनी सुरक्षेसाठी कोर्टात अर्ज केला होता. आम्ही अंबालाच्या एसपीकडे सुरक्षेची मागणी केली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही मदत न मिळाल्याने आम्हाला कोर्टात यावं लागल्याचं या दोघांनी कोर्टाला सांगितलं. आमच्याकडे कोर्टात येण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता. त्यानंतर कोर्टाने अंबालाच्या एसपीला या दोघांनाही तात्काळ सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले.

मर्जीने विवाह करणे हा मूलभूत अधिकारच

दरम्यान, यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने मर्जीने विवाह करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला होता. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस. सुजाता सचिन शंकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होात. दोन व्यक्तिंच्या नात्याच्या स्वातंत्र्याचं जात किवा धर्माच्या कारणाने कोणीही हनन करू शकत नाही. आपल्या मनाप्रमाणे विवाह करण्याचा अधिकार संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकारात समाविष्ट आहे, असं कर्नाटक कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं होतं. सॉफ्टवेअर इंजीनियर वाजिद खान यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय दिला होता. वाजिद खान नावाच्या व्यक्तीसोबतच्या संबंधांना आपले कुटुंबीय विरोध करत असल्याचा आरोप रम्या नावाच्या एका महिलेने केला होता. आमच्या नात्याला विरोध करून कुटुंबीयांकडून आमच्या स्वातंत्र्याचं हनन केलं जात आहे, असा दावा या महिलेने केला होता. तर, या दोघांच्या विवाहाला आमची परवानगी आहे. पण रम्याच्या घरच्यांकडून या विवाहाला परवानगी मिळत नसल्याचं वाजिदच्या आईने म्हटलं होतं. त्यावर ते दोघंही आपला व्यक्तीगत निर्णय घेण्यास सक्षम असल्याचा निर्णय कोर्टाने दिला होता. (Marriage Of Muslim Woman With Hindu Man Not Valid, Says High Court)

संबंधित बातम्या:

झारखंडमध्येही भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 75 टक्के आरक्षण; तरुणांना बेरोजगार भत्ताही

महिलेचं नाक फोडल्याच्या प्रकरणाला नवं वळण, डिलीव्हरी बॉयचा धक्कादायक दावा

मुलीच्या लग्नासाठी स्वीडिश कंपनीची आलिशान बस गिफ्ट, नितीन गडकरींनी आरोप फेटाळले

(Marriage Of Muslim Woman With Hindu Man Not Valid, Says High Court)

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.