परदेशात नोकरीसाठी विचार करताय? ‘या’ देशांत होईल जादा बचत
परदेशात नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी केवळ पगार नव्हे, तर त्या देशातील खर्चही महत्त्वाचा ठरतो. काही देशांत खर्च एवढा जास्त असतो की पगार असूनही बचत होत नाही, तर काही ठिकाणी कमी खर्चात जास्त बचत शक्य होते, जाणून घ्या अशा देशांची यादी.

परदेशात नोकरी करणं हा अनेक भारतीय युवकांचा मोठा स्वप्न असतं. लाखो लोक दरवर्षी विविध देशांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांसाठी जातात. मात्र, चांगला पगार असूनही खर्च जास्त असल्यास सेव्हिंग करणं कठीण होतं. त्यामुळे योग्य देशाची निवड करणे गरजेचे आहे. काही देश अत्यंत महागडे असून तिथे राहणे, जेवण, ट्रान्सपोर्ट इत्यादी गोष्टींचा खर्च खूप जास्त असतो, तर काही देश असे आहेत जिथे अगदी कमी खर्चात चांगलं जीवन जगता येतं आणि सेव्हिंगही चांगलं करता येतं.
आंतरराष्ट्रीय इन्शुरन्स कंपनीने केलेल्या एका अभ्यासानुसार जगातले काही देश हे अत्यंत महागडे तर काही खूपच स्वस्त आहेत. हाच डेटा लक्षात घेता परदेशी नोकरीसाठी योग्य देश कोणता याचा विचार होऊ शकतो.
सर्वात महागडे देश
1. स्वित्झर्लंड : जगातील सर्वात महागडा देश. येथे जिम मेंबरशिपसाठी महिन्याला ₹7500 लागतात, तर एक चित्रपट पाहण्यासाठी ₹2000 खर्च येतो. पब्लिक ट्रान्सपोर्टही महागडा आहे आणि एका जेवणासाठी ₹11,000 खर्च येतो.
2. आइसलँड : दुसऱ्या क्रमांकावर असून येथे एका ट्रिपसाठी ₹440 ट्रान्सपोर्ट खर्च आहे. पेट्रोल ₹215 प्रति लिटर, इंटरनेटचा महिन्याचा खर्च ₹7000 आणि जेवण ₹12,000 इतका महाग आहे.
3. नॉर्वे : येथे बस तिकीट ₹350, आणि एका व्यक्तीच्या जेवणासाठी ₹8000 इतका खर्च येतो. त्यामुळे हा देखील अत्यंत महागडा देश मानला जातो.
सर्वात स्वस्त देश
1. मेक्सिको : सर्वात स्वस्त देशांमध्ये अग्रक्रमावर आहे. येथे राहणीमानाचा खर्च कमी आहे. अपार्टमेंट स्वस्तात भाड्याने मिळतो आणि जेवणाचे पर्यायही स्वस्त आहेत.
2. लिथुआनिया : युरोपमधील सर्वात स्वस्त देश. इंटरनेटचा खर्च फक्त ₹1100 आणि पब्लिक ट्रान्सपोर्टही किफायती आहे. युरोपात नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगला पर्याय.
3. पोलंड : युरोपात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात स्वस्त देश आणि जगभरात तिसऱ्या क्रमांकावर. येथेही इंटरनेट, ट्रान्सपोर्ट आणि निवासाचा खर्च खूपच कमी आहे, आणि नोकरीसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत.
शेवटी काय, जर तुम्ही परदेशात जाऊन नोकरी करून जास्तीची बचत करू इच्छित असाल, तर फक्त पगार न पाहता खर्चाचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. मेक्सिको, लिथुआनिया आणि पोलंडसारख्या देशांमध्ये राहणीमानाचा खर्च कमी असल्याने सेव्हिंग्स अधिक करता येते. दुसरीकडे, स्वित्झर्लंड, आइसलँड आणि नॉर्वे यांसारख्या देशांमध्ये पगार जरी चांगला असला, तरी खर्च अधिक असल्यामुळे बचत करणं कठीण होऊ शकतं.
