शिष्यवृत्ती मान्य करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची रक्कम लवकरच देणार, प्राजक्त तनपुरेंची माहिती 

सर्व प्रलंबित विषयांचा तातडीने निपटारा केला जाईल, अशी सूचना तुनपुरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:42 PM, 14 Jan 2021

मुंबई : ‘राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित, स्वायंत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अंतिम वर्ष उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, टी.सी. इत्यादी प्रमाणपत्राची अडवणूक करु नये. ते विद्यार्थ्यांना तात्काळ उपलब्ध करुन द्यावे, असे उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. तसेच शिष्यवृत्ती मान्य करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अनुदानाव्दारे देय असून ती लवकरच देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (Prajakt Tanpure Comment On student Scholarship)

‘राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदविका आणि पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात शिष्यवृत्तीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही महाविद्यालयांना शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे महाविद्यालय व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, टी. सी (Transfer Certificate) देण्यास अडवणूक करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर नुकतंच राज्यमंत्री तनपुरे यांनी शिष्यवृत्तीची आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, उच्च आणि तंत्र शिक्षण संचालनालय अंतर्गत राज्यातील 1 लाख 48 हजार विद्यार्थ्यांना 620 कोटी रुपये डीबीटीद्वारे वितरित करण्यात आले. आर्थिकदृष्या मागास प्रवर्गातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजनेद्वारे उच्च व तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डी.बी.टी पध्दतीने शिष्यवृती दिली जाते.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या 95 टक्के विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे त्यांच्या बचत खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक बँकेच्या बचत खात्याशी लिंक करण्यासाठी (Aadhar Seeding) अडचण निर्माण झाली. अशा 77 हजार विद्यार्थ्यांपैकी 64 हजार विद्यार्थ्यांना पुढील 10 दिवसांमध्ये शिष्यवृत्ती देण्यात यावी.

फी संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करणार

तर उर्वरित 13 हजार विद्यार्थ्यांना त्यांचे (Aadhar Seeding) लिंक करण्यासाठी विशेष मोहिम (Special Drive), वैयक्तिक SMS, E-mail व्दारे याबाबत माहिती देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालय स्तरावर पाठविण्यात यावी, जेणेकरुन सर्व प्रलंबित विषयांचा तातडीने निपटारा केला जाईल, अशी सूचना तुनपुरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच 2018-19 पासून महाविद्यालयांच्या इतर फी संदर्भातील तांत्रिक अडचणी समन्वयाने दूर करण्यात येतील. यासाठी महाविद्यालयांना लवकरात लवकर रक्कम प्रदान करण्यात येईल. शिष्यवृत्तीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची सर्वोतोपरी खबरदारी सरकार घेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, अशा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला. (Prajakt Tanpure Comment On student Scholarship)

संबंधित बातम्या : 

डांबर टाकलंय की नुसत्या रेघा ओढल्यात? राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

शाळा सुरू झाली तरी शाळेत येणे सक्तीचे नाही; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची माहिती