NTPC मध्ये 27 मेडिकल स्पेशालिस्ट आणि 20 असिस्टंट मॅनेजरसाठी भरती, लवकर करा अर्ज

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एनटीपीसी लिमिटेड ntpccareers.net च्या भरतीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यानंतर मुख्यपृष्ठावरच दिलेल्या वर्तमान ओपनिंग विभागात, संबंधित भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा, लिंकवर क्लिक करा.

NTPC मध्ये 27 मेडिकल स्पेशालिस्ट आणि 20 असिस्टंट मॅनेजरसाठी भरती, लवकर करा अर्ज
government job 2021

नवी दिल्ली : एनटीपीसीमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एनटीपीसी लिमिटेडने 27 वैद्यकीय विशेषज्ञ आणि 20 सहाय्यक व्यवस्थापकपदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवलेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 सप्टेंबर 2021 रोजी संपणार आहे. अशा परिस्थितीत ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी शक्य तितक्या लवकर अर्ज करावा.

याप्रमाणे अर्ज करा

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एनटीपीसी लिमिटेड ntpccareers.net च्या भरतीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यानंतर मुख्यपृष्ठावरच दिलेल्या वर्तमान ओपनिंग विभागात, संबंधित भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा, लिंकवर क्लिक करा. मग नवीन पेजवर ‘अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा’ द्वारे किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून थेट अर्जाच्या पेजवर पोहोचू शकता. अर्ज पेजवर उमेदवार विचारलेले तपशील भरून आणि त्यांची कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करू शकतील. ऑनलाईन अर्ज करताना 300 रुपये अर्ज फीदेखील भरावी लागेल. एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक श्रेणी आणि महिला उमेदवारांना अर्ज फी भरावी लागणार नाही.

पोस्टनिहाय पात्रता

वैद्यकीय तज्ज्ञ-ई -4 स्तरासाठी उमेदवारांना MD/DNB नंतर किमान 1 वर्षाचा अनुभव असावा. त्याच वेळी ई -3 स्तरासाठी, नवीन एमडी / डीएनबी उत्तीर्ण अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांचे कमाल वय 37 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक व्यवस्थापक – उमेदवार CA किंवा ICWA उत्तीर्ण असावेत. तसेच उमेदवारांचे कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वरच्या वयोमर्यादेत शिथिलतेची तरतूद आहे, अधिक तपशीलांसाठी एनटीपीसी लिमिटेड भरती अधिसूचना पाहा.

भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये 400 पदांवर भरती

भारतीय सैन्याच्या एएससीच्या विविध सेंटरमध्ये 400 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एएससी सेंटर नॉर्थ, एएससी सेंटर साऊथ मध्ये सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर, क्लिनर, कुक, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, लेबर, सफाईवाला या पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन घेऊन तो भरुन पाठवू शकतात. भारतीय सैन्य दलाच्य एएससी भरती प्रक्रियेद्वारे 400 पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. त्या जाहिरातीनुसार सर्व पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी निश्चित करण्यात आली आहे. पदनिहाय अनुभव असणं आवश्यक आहे. ड्रायव्हर पदासाठी उमदेवाराकडं अवजड आणि हलके वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. तर, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर पदासाठी कॅटरिगं प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा पूर्ण झालेला असणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

IDBI Executive Admit Card 2021: आयडीबीआय बँकेकडून एक्झिक्युटिव्ह पदाच्या परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी, डाऊनलोड कसं करायचं?

SSC GD Constable 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल 25 हजार जागांवर भरती, 31 ऑगस्टपर्यंत नोंदणींची संधी, वाचा सविस्तर

Recruitment for 27 Medical Specialists and 20 Assistant Managers in NTPC, apply early

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI