मुलगी नव्हे, 12 वर्षाच्या मुलावर शेतात नेऊन अतिप्रसंग, वासनांध नराधमाच्या मुसक्या आवळल्या

राज्यातल्या विविध ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना आता हिंगोलीमधून धक्क्दायक घटना समोर येतीय. हिंगोलीतील 12 वर्षाच्या मुलावर शेतात नेऊन अतिप्रसंग करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी विकृताविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

मुलगी नव्हे, 12 वर्षाच्या मुलावर शेतात नेऊन अतिप्रसंग, वासनांध नराधमाच्या मुसक्या आवळल्या
प्रातिनिधिक फोटो

हिंगोली :  राज्यातल्या विविध ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना आता हिंगोलीमधून धक्क्दायक घटना समोर येतीय. हिंगोलीतील 12 वर्षाच्या मुलावर शेतात नेऊन अतिप्रसंग करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी विकृताविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव शिवारातील ही घटना घडली. हिंगोलीतल्या सेनेगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्ह ादाखल केला आहे. आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

पीडित 12 वर्षीय मुलगा राहणार गोरेगाव हा अल्पवयीन, अंध आदिवासी तसेच दिव्यांग आहे. आरोपीला माहिती असूनही त्याने मुलाला शेतात नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. गोरेगाव पोलिसांनी विकृताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्यास अटकही केली आहे.

घरासमोर खेळणारा चिमुरडा अचानक गायब, शोधाशोधीनंतर विहिरीत मृतदेह, डोंबिवलीत हळहळ

घरासमोर खेळत असलेल्या चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. 5 वर्षांच्या चिमुकल्याचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.

पाच वर्षांचा चिमुरडा शेजारच्या विहिरीत पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीमधील खंबाळपाडा भोईरवाडी येथील सिताई नगर मध्ये घडली आहे. सिद्धार्थ गणेश कानगट्ट असे या मयत मुलाचे नाव आहे. सिद्धार्थ दिव्यांग होता. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास सिद्धार्थ नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर खेळत होता. बऱ्याच वेळाने सिद्धार्थ कोठेही दिसत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

सिद्धार्थचा मृतदेह विहिरीत सापडला

दुपारच्या सुमारास शेजाऱ्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता सिद्धार्थ पाण्यावर तरंगताना आढळला. नागरिकांनी तातडीने त्याला पाण्यातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

(12-year-old boy was taken to a field and Tortured in hingoli goregaon)

हे ही वाचा :

एकेकाळचा सख्खा मित्रच ठरला पक्का वैरी, टोळक्याकडून गुंडाची भर रस्त्यात दिवसाढवळ्या हत्या, उल्हासनगरात भयानक थरार

कामावरुन काढून टाकल्याचा राग, पुण्यात चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवली

आधी शरीरसुखाची मागणी, विरोध करताच 60 वर्षीय महिलेची हत्या, नंतर प्रेतावर बलात्कार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI