AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेकिंग दरम्यान गाडी थांबवायला सांगणाऱ्या पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन वर्ष आरोपी चकवा देत होता, पण…

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न चांगलाच अंगलट आला आहे. पोलिसांना चकमा देऊन आरोपी सतत फरार होत होता.

चेकिंग दरम्यान गाडी थांबवायला सांगणाऱ्या पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन वर्ष आरोपी चकवा देत होता, पण...
दोन वर्षापासून वाँटेड आरोपीला अटकImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 25, 2023 | 3:07 PM
Share

कल्याण : चेकिंग दरम्यान पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. दोन वर्ष आरोपी पोलिसांना चकमा देत होता. पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सूरज खैरीराम कायरिया उर्फ बारक्या असे या आरोपीचे नाव असून तो अवैध वाहतूक प्रकरणातही वाँटेड आरोपी आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत गोविंदवाडी परिसरातून कल्याण बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

काय आहे प्रकरण?

साधारण दोन वर्षापूर्वी कल्याण पश्चिमेकडे गोविंदवाडी एपीएमसी परिसरात पोलिसांची चेकिंग सुरु होती. यावेळी आरोपीची गाडी येताना दिसताच अवैध वाहतूक करत असल्याचा पोलिसांना संशय आला. यामुळे पोलिसांनी चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र चालकाने पोलिसांना न जुमानता गाडीचा वेग वाढवत पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने प्रसंगावधान राखल्याने पोलीस लगेच बाजूला झाल्याने ते बचावले. यानंतर आरोपी पळून गेला.

गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला

याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेली दोन वर्षे पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते. मात्र तो हाती लागत नव्हता. पण गोविंदवाडी परिसरात आरोपी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घोलप यांनी पोलीस पथकासह परिसरात सापळा रचला.

आरोपी परिसरात येताच त्याची ओळख पटवत तात्काळ पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस तपासात आरोपी अवैध वाहतूक प्रकरणातही वाँटेड असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.