AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अँटालियाप्रकरणातील मेसेज तिहार तुरुंगातून, तपासाची दिशा बदलण्यासाठी षडयंत्र; दिल्ली पोलिसांच्या हाती पुरावे

अँटालिया प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Antilia Case: Special Cell recovers Phone from IM terrorist from Tihar jail)

अँटालियाप्रकरणातील मेसेज तिहार तुरुंगातून, तपासाची दिशा बदलण्यासाठी षडयंत्र; दिल्ली पोलिसांच्या हाती पुरावे
सचिन वाझे यांना पुन्हा प्रकाशझोतात यायचे होते. ख्वाजा युनूस प्रकरणामुळे पोलीस दलात गेलेली आपली पत पुन्हा मिळवायची होती.
| Updated on: Mar 26, 2021 | 11:35 AM
Share

मुंबई: अँटालिया प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अँटालिया प्रकरणात करण्यात आलेला मेसेज दुबईतून नव्हे तर तिहार तुरुंगातून करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली स्पेशल सेलच्या हाती आली असून ज्या मोबाईलवरून हा मेसेज करण्यात आला होता, तो मोबाईलही जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Antilia Case: Special Cell recovers Phone from IM terrorist from Tihar jail)

एनआयएच्या तपासात आणखी एक धक्कादायक मुद्दा समोर आला आहे. जिलेटीन कार प्रकरणात दाऊद गँगचा मुद्दा समोर आणण्याचा प्रयत्न झाला होता. हा प्रकार तपासाची दिशा बदलण्यासाठी करण्यात आला होता. मात्र,ते शक्य झालं नाही. या मुद्यावर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांची बदनामी होण्याची शक्यता आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ 25 फेब्रुवारी रोजी जिलेटिनने भरलेली कार सापडली होती. या घटनेचा तपास तात्काळ क्राईम ब्रँचने सुरू केला होता. हा तपास सुरू असतानाच एक टेलिग्राम मेसेज आला होता. या मेसेजमध्ये मुकेश अंबानी यांना धमकी देण्यात आली होती. त्यात खंडणी ही मागितली होती. या बाबत दिल्ली स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता हा मेसेज तिहार जेल परिसरातून इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी पाठवल्याच उघड झालं आहे. दिल्ली पोलिसांनी हा फोनही जप्त केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून मेसेज

जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पियो गाडीत एक लेटर ही सापडलं होत. मात्र, या गाडीची जबाबदारी घेणारा एक मेसेज 27 फेब्रुवारी रोजी टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून आला होता. त्यात या लेटरची जबाबदारी जैश उल हिंद या संघटनेने घेतली होती आणि या संघटनेने खंडणीची मागणी ही केली होती.

सिंग यांच्याकडून खासगी कंपनीला जबाबदारी

या घटनेचा तपास करण्यासाठी तेव्हाचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका खासगी सायबर एक्सपर्ट कंपनीला जबाबदारी दिली होती. मात्र, हे सर्व तपास प्रक्रियेत ठेवलं नाही. त्यामुळे आता हा मुद्दा संशायस्पद म्हणून पाहिला जात आहे. एनआयएने याबाबत केलेल्या तपासा नुसार जैश उल हिंद हे टेलिग्राम चॅनेल 27 जानेवारीला बनवलं होत. त्यात 49 लोक जोडली गेली होती. या ग्रुपमध्ये कोणीही सहभागी होऊ शकत होत. प्रत्यक्षात दहशतवादी चॅनेल, ग्रुपमध्ये सहसा कोणालाही सहभागी करून घेतलं जातं नाही. त्यानंतर या चॅनेलद्वारे पहिला एसएमएस 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी आला होता. हा मेसेज 690 लोकांनी पाहिला. त्यानंतर तिसरा धमकीचा एसएमएस पहाटे 4 वाजून 31 मिनिटाला पोस्ट झाला होता. हा एसएमएस 851 व्यक्तींनी पाहिला होता. मात्र त्यानंतर 30 मिनिटांनी हे टेलिग्राम चॅनेल डिलीट केलं गेलं होत, अशी माहितीही समोर आली आहे.

खासगी सायबर कंपनीची चौकशी

आता तपासात परमबीर सिग यांनी नेमलेल्या खासगी सायबर कंपनीच्या अहवालाबाबत एनआयए चौकशी करत आहे. या टेलिग्रामचा सर्व्हर परदेशात आहे. त्यामुळे त्याबाबत काही चौकशी करायची असल्यास केंद्र सरकारला कळवावे लागते. केंद्र सरकार संबंधित यंत्रणेमार्फत त्याची चौकशी करत असते. अशी परस्पर चौकशी करत येत नाही. या नंतरही मुबंई पोलिसानी ती चौकशी केली. एनआयए सूत्राच्या माहिती नुसार दाऊद गँगमधील एका मोठ्या व्यक्तीला धमकीचा एसएमएस पाठवण्यास सांगण्यात आलं होतं. हा एसएमएस दुबई आदी देशातून टेलिग्रामचा एसएमएस पाठवण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र , हा एसएमएस दुबई येथून न पाठवता तो तिहार जेल मधून पाठवण्यात आला. आता प्रकरणात किती तथ्य आहे आणि दाऊद गँगच्या कोणाला एसएमएस पाठवायला सांगितल होतं, याचा तपास सुरू आहे, असं सूत्रांनी सांगितलं. (Antilia Case: Special Cell recovers Phone from IM terrorist from Tihar jail)

संबंधित बातम्या:

UPA हा दिल्लीतला विषय, जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी यामध्ये पडू नये; राऊतांचा नाना पटोलेंवर पलटवार

सचिन वाझेंना बळीचा बकरा कोणी बनवलं? NIA कोर्टात मोठं विधान

सचिन वाझेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; 3 एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ

(Antilia Case: Special Cell recovers Phone from IM terrorist from Tihar jail)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.