मृत्यूनंतर गणेशचा दफनविधी केला! 3 दिवसांनंतर पोलिस आले, दफन केलेलं प्रेत बाहेर काढून….

मृत्यूनंतर गणेशचा दफनविधी केला! 3 दिवसांनंतर पोलिस आले, दफन केलेलं प्रेत बाहेर काढून....
प्रातिनिधीक फोटो

गणेश याचा नैसर्गिक मृत्यू झाला की कुणी त्याची हत्या केली होती, याबाबतचा तपास आता सुरु आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून गणेशच्या मृत्यू गूढ उकलतं की आणखी नवे प्रश्न उभे राहतात, याकडे आता सगळ्यांची नजर लागली आहे.

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 18, 2022 | 11:25 PM

बीड : बीडमधून (Beed) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या शिरुर कासार तालुक्यात चक्क दफनविधी केल्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांनी येऊन दफन केलेला मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यामध्ये पिंपळनेर ही गावामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. पिंपळनेर गावातील 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी या तरुणाचा दफनविधीदेखील केला होता. मात्र अज्ञात व्यक्तीने शिरूर पोलिसांना या तरुणाचा घातपात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी ज्या ठिकाणी या तरुणाचा दफनविधी केला त्या ठिकाणी जाऊन मृतदेह पुन्हा आपल्या ताब्यात घेतलाय.

दफन केलेल्या बॉडीचं नव्यानं पोस्टमॉर्टेम

दफन केलेली बॉडी आता पोलिसांनी आपल्या ताब्यात गेतील आहे. आता ही बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवली असून पोस्टमॉर्टेम रिपोर्टची सगळ्यांचा प्रतीक्षा आहे.

कुणाच्या मृत्यूबाबत संशय?

बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यामध्ये पिंपळनेर या गावातील गणेश शांतीलिंग आलेकर मृत्यूनंतर दफनविधी करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. गणेश आपल्या वडिलांसोबत गावातच राहत होता. गणेशचं गावातच एक छोटं दुकान होतं. तीन दिवसापूर्वी त्याचा अचानक मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी गणेशचा अकस्मात मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.

दरम्यान, पोलिसांना गावातीलच एका व्यक्तीने घातपात झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. गणेश चा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास आता शिरूर पोलिस करत आहेत. गणेश याचा नैसर्गिक मृत्यू झाला की कुणी त्याची हत्या केली होती, याबाबतचा तपास आता सुरु आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून गणेशच्या मृत्यू गूढ उकलतं की आणखी नवे प्रश्न उभे राहतात, याकडे आता सगळ्यांची नजर लागली आहे.

संबंधित बातम्या :

INS Ranveer blast : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेत स्फोट, नौदलाचे तीन जवान शहीद

विजया बाविस्कर हत्या प्रकरण; मैत्रीणीनेच केला विश्वासघात, ‘असा’ झाला हत्येचा उलगडा

बायको मुलांना विष दिलं, मग स्वतः गळफास घेतला! नागपुरात अख्ख्या कुटुंबानं का केली आत्महत्या?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें