विजया बाविस्कर हत्या प्रकरण; मैत्रीणीनेच केला विश्वासघात, ‘असा’ झाला हत्येचा उलगडा

विजया बाविस्कर हत्या प्रकरण; मैत्रीणीनेच केला विश्वासघात, 'असा' झाला हत्येचा उलगडा
लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला

विजया बाविस्कर यांच्या हत्येचे गुढ उलगडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. धक्कादायक म्हणजे विजया बाविस्कर यांच्या मैत्रीणीनेच त्यांची हत्या केली आहे.

अमजद खान

| Edited By: अजय देशपांडे

Jan 18, 2022 | 9:53 PM

मुंबई :  विजया बाविस्कर (Vijaya Baviskar) यांच्या हत्येचे गुढ उलगडण्यात अखेर पोलिसांना (Mumbai Police) यश आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV footage) मदतीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. धक्कादायक म्हणजे विजया बाविस्कर यांच्या मैत्रीणीनेच त्यांची हत्या केली आहे. या हत्येमागे चोरीचा उद्देश होता की आणखी काही? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  सोमवारी सकाळी डोंबिवली पूर्व भागातील टिळक चौक परिसरात आनंद शीला इमारतीत  एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. विजया बाविस्कर वय 58 असे या महिलेचे नाव होते. विजया यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. मात्र आरोपीने मागे कोणताही पुरावा न ठेवल्याने आरोपीला अटक करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यातच विजया यांच्याकडे असलेले दागिने देखील गायब असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांना केला होता. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असावी असा अंदाज पोलिसांनी लावला, व त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या 24 तासांध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मैत्रीणीनेच केला विश्वासघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तीथे विजया बाेविस्कर यांचा मृतदेह पडलेला होता. त्यांच्याजवळचे दागिने गायब असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. ही हत्या कदाचीत चोरीच्या उद्देशाने करण्यात आली असावी अशी संका पोलिसांना होती. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले तेव्हा त्यांना एका सीसीटीव्हीमध्ये रात्री तीनच्या सुमारास एक महिला हातात एक पिशवी घेऊन, एकटीच रस्त्याने चालत असल्याचे दिसून आले. इतक्या रात्री ही महिला या परिसरात काय करत आहे? असा प्रश्न पोलिसांना पडला, पोलिसांनी या महिलेचा शोध घेतला असता या महिलेचे नाव सीमा खोपडे असल्याचे समोर आले. सीमा खोपडे हीचे याच परिसरात पोळीभाजी केंद्र आहे. ही महिला बाविस्कर यांची मैत्रीण होती.

असा झाला हत्येचा उलगडा

दरम्यान पोलिसांनी सीमा खोपडेकडे चौकशी केली असता, आपणच विजया यांचा खून केल्याची कबुली आरोपी महिलेने दिली. त्यानंतर या महिलेले सर्व घटनाक्रम देखील सांगितला. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला विजया यांच्या घरी गेली होती, तीने विजया यांना आज मला तुझ्याच घरी झोपायचे आहे असे सांगितले. त्यानंतर सीमाने मध्यरात्री विजया यांचा गळा दाबला आणि घराला बाहेरून कडी लावून ती घराबाहेर पडली.  मात्र ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चोरी झालेले दागिने अद्याप हस्तगत करण्यात आले नसून, या हत्येमागे चोरीचा उद्देश होता की अन्य काही कारण याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

उच्चशिक्षित तरुणाकडून 35 पेक्षा अधिक तरुणींची फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून उकळले लाखो रुपये, आरोपीला अटक

आर्वी गर्भपात प्रकरण, अखेर डॉ. नीरज कदम बडतर्फ, पालिकेची कदम रुग्णालयाला नोटीस

बायको मुलांना विष दिलं, मग स्वतः गळफास घेतला! नागपुरात अख्ख्या कुटुंबानं का केली आत्महत्या?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें