Zomato Delivery प्रकरणात पुन्हा ट्विस्ट, मारहाणीचा आव आणलेल्या महिलेवरच गुन्हा

आपण ऑर्डर कॅन्सल करण्यास सांगितलं असता झोमॅटो डिलीव्हरी बॉय कामराजने हल्ला केल्याचा दावा हितेशाने केला होता. (Bengaluru Hitesha Chandranee Zomato Kamaraj)

Zomato Delivery प्रकरणात पुन्हा ट्विस्ट, मारहाणीचा आव आणलेल्या महिलेवरच गुन्हा
आरोपी हितेशा चंद्रानी आणि झोमॅटो फूड डिलीव्हरी एक्झिक्युटिव्ह कामराज
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 8:04 AM

बंगळुरु : झोमॅटो डिलीव्हरी एक्झिक्युटिव्हचा (Zomato delivery executive) छळ केल्याबद्दल सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि ब्युटी इन्फ्लुएन्सर हितेशा चंद्रानीविरोधात (Hitesha Chandranee) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामराजच्या (Kamaraj) तक्रारीनंतर 31 वर्षीय हितेशाविरोधात सोमवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला. प्राणघातक हल्ला, एखाद्याचा अपमान करण्याच्या हेतूने गुन्हेगारी बळाचा वापर आणि धमकी देणे या आरोपांखाली हितेशाविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती आहे. (Bengaluru Police booked Hitesha Chandranee after Zomato delivery executive Kamaraj files complaint)

काय आहे प्रकरण?

झोमॅटोकडून 9 मार्चला झालेली फूड डिलीव्हरी 59 मिनिटं उशिरा होती. त्यामुळे आपण ऑर्डर कॅन्सल करण्यास सांगितलं असता झोमॅटो डिलीव्हरी बॉय कामराजने हल्ला केल्याचा दावा हितेशाने केला होता. आपल्या नाकावर गुद्दा दिल्याने जखम झाल्याचा आरोपही तिने केला होता. आपल्या आरोपांना बळ देण्यासाठी तिने नाकातून रक्त येत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

सोशल मीडिया आधी हितेशाच्या बाजूने

महिलेच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत झोमॅटोने आरोपी कामराजचे निलंबन केले होते. तर पोलिसांनी त्याला अटक करुन जामिनावर सोडले होते. हितेशाच्या नाकातून रक्त वाहत असल्यामुळे साहजिकच तिला सोशल मीडियावर सहानुभूती मिळाली. डिलिव्हरी बॉयवर कडक कारवाई केली जावी, अशी जोरदार मागणी होऊ लागली.

कामराजची बाजू समोर

झोमॅटोसोबत तीन वर्ष काम केलेल्या कामराजची बाजू त्यानंतर समोर आली. रस्त्याचे बांधकाम सुरु असल्यामुळे मला डिलीव्हरीसाठी उशीर झाला. मी त्यांची माफीही मागितली. मात्र तक्रारदार महिलेने आरडाओरड आणि शिवीगाळ करत मलाच चपलेने मारण्याचा प्रयत्न केला. आपल्याला मारहाण करताना महिलेचा स्वतःलाच हात लागला आणि अंगठी लागून तिच्या नाकातून रक्त आले असावे, असा दावा कामराजने केला होता. (Bengaluru Police booked Hitesha Chandranee after Zomato delivery executive Kamaraj files complaint)

सोशल मीडियावर दोन गट

कामराजने रडत रडत आपल्या घरची परिस्थिती नाजूक असून मला शांतीने जगायचं आहे, अशी विनवणी केली. यासंबंधी व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया दोन गटांमध्ये विभागलं गेलं. तक्रारदार महिला नेहमीच बरोबर असते, अशातला भाग नाही, असं म्हणणाऱ्या गटाचा आवाज वाढला.

झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी जखमी हितेशाला वैद्यकीय मदत देण्याची तयारी दाखवली. सोबतच कामराजलाही कायदेशीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. कामराजने पाच हजार डिलिव्हरी केल्या असून त्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 4.75/5 रेटिंग्ज मिळाल्याचंही गोयल यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

ऑर्डर कॅन्सल केली म्हणून डिलीव्हरी बॉय भडकला, रागाच्या भरात महिलेचं फोडलं नाक

महिलेचं नाक फोडल्याच्या प्रकरणाला नवं वळण, डिलीव्हरी बॉयचा धक्कादायक दावा

(Bengaluru Police booked Hitesha Chandranee after Zomato delivery executive Kamaraj files complaint)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.