AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली वहिनी, सासरच्या विरोधामुळे सहा वर्षांच्या लेकासह पोलिसात धाव

भागलपूर येथील एका तरुणाचा विवाह 10 वर्षांपूर्वी गोड्डा आर्टेरी येथील एका महिलेसोबत झाला होता. लग्नाच्या 6 वर्षांनंतर त्याचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याची पत्नी आपल्या मुलासह बिहार सोडून झारखंडमध्ये राहू लागली.

दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली वहिनी, सासरच्या विरोधामुळे सहा वर्षांच्या लेकासह पोलिसात धाव
प्रातिनिधीकImage Credit source: Wikipedia
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 3:30 PM

पाटणा : बिहारमधील भागलपूरमध्ये दीर (Brother in law) आणि भावजय (Sister in law) यांच्यातील अनोखं प्रेम प्रकरण (Love Story) समोर आलं आहे. पती निधनानंतर वैधव्य आलेली महिला आपल्या दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र सासरच्या मंडळींनी दिराचे अन्यत्र लग्न ठरवल्याने तिचा तीळपापड झाला. महिलेने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्यासह पोलीस ठाणे गाठले आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महिलेचे दिरावरील प्रेम पाहून पोलीसही चकित झाले. बिहारमधील भागलपूरमध्ये जोगसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काली ठाकूर भागात हा प्रकार घडला.

काय आहे प्रकरण?

भागलपूर येथील एका तरुणाचा विवाह 10 वर्षांपूर्वी गोड्डा आर्टेरी येथील एका महिलेसोबत झाला होता. लग्नाच्या 6 वर्षांनंतर त्याचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याची पत्नी आपल्या मुलासह बिहार सोडून झारखंडमध्ये राहू लागली.

महिलेचा दावा काय?

यादरम्यान पतीच्या धाकट्या भावासोबत आपले सूत जुळले. दोघांची वारंवार भेट होऊ लागली आणि दिवसेंदिवस जवळीक वाढू लागली. कुटुंबीयांच्या संमतीने आपण दिराशी लग्न केले आणि दोघेही एकत्र राहू लागलो, असा दावा महिलेने केला. मात्र आता आपले सासरचे लोक नवऱ्याचे (दीर) दुसरे लग्न लावत आहेत, असा आरोप तिने केला आहे. ही बाब समजताच ती तात्काळ झारखंडहून बिहारला आली.

महिलेने भागलपूरमधील जोगसर पोलीस ठाणे गाठले आणि पतीसोबत राहू देण्यासाठी गयावया करु लागली. पतीचे दुसरे लग्न लावून दिले जाऊ नये, असे तिने पोलिसांना सांगितले. यादरम्यान महिलेच्या सासरच्या लोकांनीही पोलीस ठाणे गाठून आपल्या धाकट्या मुलाचे लग्न सुनेसोबत लावण्यास नकार दिला. यावरून पोलीस ठाण्यात मोठा गदारोळ झाला.

दुसऱ्या लग्नाची कागदपत्रंही सादर

महिलेने आपल्या दुसऱ्या लग्नाची कागदपत्रे अनेक वेळा पोलिसांसमोर दाखवली आणि कोर्टात जाण्याचाही इशारा दिला. मात्र दीर बंटी हा आपल्या वहिनीसोबत राहण्यास नकार देत असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

आतापर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागलेला नाही. त्याच वेळी, सासूच्या म्हणण्यानुसार, मोठ्या मुलाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्यांची सून माहेरी राहते. तिला सासरी येण्यासाठी बोलावले असता ती आली नाही, असा दावाही सासूने केला आहे.

संबंधित बातम्या :

वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट, ब्लॅकमेल करत पुण्यात दिराकडून बलात्कार

फोनवर कोणाशी बोलतेयस? वहिनीने उत्तर नाही दिलं, चिडलेल्या दिराकडून गळा चिरुन खून

जयपूरमध्ये सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार, आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.