चिनी आरोपींकडून 5 लाख लोकांची ऑनलाईन फसवणूक, ‘ही’ काळजी घ्या अन्यथा तुम्हीही बळी ठरण्याचा धोका

अनेक ग्राहक ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरत आहेत. यात विदेशी गटांचाही समावेश असल्याचं समोर आलंय.

चिनी आरोपींकडून 5 लाख लोकांची ऑनलाईन फसवणूक, 'ही' काळजी घ्या अन्यथा तुम्हीही बळी ठरण्याचा धोका


नवी दिल्ली : ऑनलाईन बँकिंगने ग्राहकांना क्षणात आपले आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा दिलीय. त्यामुळे अनेक गोष्टी सहजसोप्या झाल्या असल्या तरी त्याचे धोकेही वाढले आहेत. अनेक ग्राहक ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरत आहेत. यात विदेशी गटांचाही समावेश असल्याचं समोर आलंय. दिल्ली पोलिसांनी तब्बल 5 लाख लोकांची लूट करणारं चिनी रॅकेट उघड केलंय. या चिनी रॅकेटमध्ये गुन्हेगारांनी 2 महिन्यात तब्बल 150 कोटी रुपयांची लूट केलीय (Know all about how to be safe from online fraud by china gang important tips).

जर ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर ही फसवणूक कशी होते, कोणत्या ट्रिक्स वापरल्या जातात हे माहिती असणं आवश्यक आहे. तरच आपण स्वतःची फसवणूक टाळू शकतो. भविष्यात कुणाही सोबत अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशी फसवणूक करणाऱ्या टोळ्या वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना फसवत आहेत. त्यांच्या फसवण्याच्या पद्धती पाहून हैराण व्हायला होतं. म्हणूनच त्यासाठी त्यांच्या या पद्धतींविषयी जाणून घेणं आवश्यक आहे.

ऑनलाईन फसवणूक कशी होते?

पोलिसांनी पकडलेल्या टोळींची चौकशी केली असता या लुटारुंच्या फसवणुकीची मोडस ऑपरेंडी उघड झालीय. ही टोळी नागरिकांची माहिती चोरी करुन त्यांना दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवते. यासाठी ते पावरबँक, सनफॅक्टरी आणि ईजप्‍लॅनसारख्या अॅप्लीकेशनचा आधार घेतला. या अॅप्सचा उपयोग करुन नागरिकांची माहिती चोरली जाते. हे सर्व बनावट गुंतवणूक अॅप आहे. यातूनच मोठ्या प्रमाणात फसवणूक होतेय.

24-35 दिवसात पैसे दुप्पट

या अॅप्लिकेशनचा वापर करुन नागरिकांना 24-35 दिवसात पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवलं जातं. याला बळी पडत अनेकजण यात पैसे गुंतवतात. इतकंच नाहीतर पैसे दुप्पट करण्याची ही योजना दिवसांप्रमाणेही असल्याचा दावा या टोळ्या करतात.

“आज 1000 रुपये गुंतवा, सायंकाळपर्यंत 1100-1200 मिळवा”

फसवणूक करणारी टोळी प्रत्येक दिवसाच्या हिशोबाने पैसे वाढवून देण्याचंही आमिष दाखवते. त्यासाठी तुम्ही आज 1000 रुपये गुंतवले तर सायंकाळपर्यंत 1100-1200 रुपये भेटतील असं सांगितलं जातं. किंवा दररोज तुमच्या पैशात वाढ करण्याचं आश्वासन दिलं जातं. विशेष म्हणजे या योजनांमध्ये 300 रुपयांपासून गुंतवणूक घेतली जाते. येथे लोक फसतात.

काय काळजी घ्याल?

या फसवणुकीपासून कमी दिवसात मोठा फायदा करुन देण्याचा दावा करणारे अनोळखी किंवा नवे अॅप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करु नका. त्याआधी त्याची पूर्ण माहिती घ्या. रिव्ह्युव वाचा. गुंतवणूक करायची असेल तर सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांमध्येच पैसे गुंतवणूक करा.

हेही वाचा :

SBI चा 44 कोटी ग्राहकांना सावधानतेचा इशारा, अन्यथा होईल मोठी फसवणूक

सावधान, कोरोना काळात ‘हा’ एक SMS तुमचं बँक अकाऊंट रिकामं करु शकतो, SBI चा इशारा

मुंबईतील यूट्यूबरचं बँक अकाऊण्ट हॅक, 23.5 लाख लुटणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअरला बेड्या

व्हिडीओ पाहा :

Know all about how to be safe from online fraud by china gang important tips