मंदिरावर कारवाई केली म्हणून प्रभाग अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात, माजी नगरसेवकासह 8 जणांविरोधात गुन्हा

माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांना प्रभाग कार्यालयासमोरच कानाशिलात लगावली. या घटनेमुळे कल्याण येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी खडकापाडा पोलिसांनी मुकुंद कोट यांच्यासह अन्य आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

मंदिरावर कारवाई केली म्हणून प्रभाग अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात, माजी नगरसेवकासह 8 जणांविरोधात गुन्हा
kalyan corporator and officer clash
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 11:05 PM

ठाणे : जुन्या गावदेवी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सुरु असलेल्या बांधकामावर कारवाई केली म्हणून माजी नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याण येथील मोहने परिसरात हा प्रकार घडला. बांधकामावर पालिकेतर्फे कारवाई केल्यामुळे माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांना प्रभाग कार्यालयासमोरच कानाशिलात लगावली. या घटनेमुळे कल्याण येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी खडकापाडा पोलिसांनी मुकुंद कोट यांच्यासह अन्य आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

मुकुंद कोट यांनी सावंत यांच्या कानशिलात लगावली

कल्याण पश्चिम येथील मोहने परिसरात एका बांधकामावर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रभाग अधिकारी राजेश सावंत पोहोचले होते. त्यांनी कारवाई सुरु करण्याआधीच स्थानिक गावकऱ्यांनी विरोध दर्शविला. तरीदेखील महापालिकेच्या पथकाने या बांधकामावर कारवाई केली. कारवाई करुन महापालिकेचे अधिकारी सावंत प्रभाग कार्यालयात परतले. या दरम्यान माजी नगरसेवक मुकुंद कोट आणि स्थानिक नागरिक कार्यालयात पोहोचले. यादरम्यान सावंत आणि कर्मचाऱ्यांसमोर कोट समर्थकांनी गोंधळ घातला. हा वाद नंतर विकोपाला गेल्यामुळे मुकुंद कोट यांनी सावंत यांच्या कानशिलात लगावली. त्याचा व्हीडीओ समोर आला आहे.

मंदिर होते याची माहीती आमच्याकडे नव्हती

स्थानिकांच्या मते ज्या ठिकाणी महापालिकेने कारवाई केली आहे; त्याठीकाणी जुने गावदेवीचे मंदिर होते. ते मंदिर जीर्ण झाले होते. स्थानिक गावकरी लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णोद्धार करणार होते. त्याठिकाणी महापालिकेचे अधिकारी कारवाईसाठी पोहोचले. त्यामुळे ही घटना घडली. तर दुसरीकडे ही घटना घडल्यानंतर त्याठीकाणी मंदिर होते याची माहीती आमच्याकडे नव्हती. त्या ठिकाणी जोते बांधण्यात आले होते. ते देखील रस्त्यात बेकायदेशीरपणो बांधले होते. त्यामुळे आम्ही कारवाई केली आहे, असे स्पष्टीकरण प्रभाग अधिकारी सावंत यांनी दिले.

गुन्हा दाखल, तपास सुरु 

दरम्यान, या प्रकरणी राजेश सावंत यांच्या तक्रारीनंतर खडकपाडा पोलिसांनी मुकुंद कोटसह अन्य सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या :

Chhorii Trailer Release | ‘लपाछपी’चा हिंदी रिमेक, नुसरत भरुचा अभिनित भयपट ‘छोरी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

औरंगाबादः वैजापूरात काका पुतण्यातील बेबनाव चव्हाट्यावर, अभय पाटील चिकटगावकर भाजपच्या गोटात जाणार

Acid Attack | विवाहित महिलेला लग्नाची मागणी, वारंवार नकार दिल्याने हात बांधून अंगावर अ‍ॅसिड ओतलं, राजधानीतील धक्कादायक घटना

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.