AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय ताड हत्या प्रकरण, पाच जणांवर गुन्हा दाखल, मुख्य सूत्रधाराची ओळख पटली; प्रकरणाला नवं वळण मिळणार?

सांगलीतील जतचे भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची चार दिवसापूर्वी भररस्त्यात हत्या करण्यात आली. या घटनेमुळे जतसह संपूर्ण जिल्हा हादरला. पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रं हलवत हत्याकांडाचा उलगडा केला आहे.

विजय ताड हत्या प्रकरण, पाच जणांवर गुन्हा दाखल, मुख्य सूत्रधाराची ओळख पटली; प्रकरणाला नवं वळण मिळणार?
विजय ताड हत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखलImage Credit source: TV9
| Updated on: Mar 20, 2023 | 12:21 PM
Share

सांगली / शंकर देवकुळे : जतचे भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ताड यांच्या हत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी फरार आहे. संदीप चव्हाण, निकेश मदने, आकाश व्हंनखंडे, किरण चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत हा या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार असून, तो फरार आहे. उमेश सावंत याच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगली जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलीस फरार आरोपी उमेश सावंतचा शोध घेत आहेत.

उमेश सावंत याने घडवली ताड यांची हत्या

भाजपचा माजी नगरसेवक उमेश सावंत हाच या खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. मात्र खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सावंत याने ताड यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून घडवून आणली, याबाबत पोलीस तपास अधिक करत आहेत. ताड यांच्या खून प्रकरणातील चौघा आरोपींना कर्नाटकच्या गोकाक येथून अटक करण्यात आली आहे. तर फरार मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक उमेश सावंत याच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली आहेत. लवकरच सावंत याला अटक केली जाईल, असे सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची सांगितले.

गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून ताड यांची हत्या

सांगलीच्या जत या ठिकाणी 17 मार्च रोजी भरदिवसा भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. विजय ताड हे दुपारच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले असता सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला होता.

या घटनेने संपूर्ण जिल्हयात खळबळ उडाली होती. ही घटना कोणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. याप्रकरणी सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन गतीने तपास सुरू केला होता. यासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली होती. अखेर या प्रकरणी पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून, यामध्ये मुख्य सूत्रधार हा भाजपच्या माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.