AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident : नगर-मनमाड महामार्गावरील भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

भीषण अपघातात एक महिला आणि पुरूषाचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या महिला आणि मुलाचाही नंतर मृत्यू झाला. दुर्दैवी बाब म्हणजे या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Accident : नगर-मनमाड महामार्गावरील भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
भीषण अपघातImage Credit source: tv9
| Updated on: May 15, 2022 | 5:36 PM
Share

अहमदनगर : राहुरी (Rahuri)तालुक्यातील गुहा या गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तर हा अपघात (terrible accident) नगर-मनमाड मार्गावर झाला असून नगरहून सटाण्याला जाणऱ्या कारला बसने उडवल्याचे कळत आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याचेही समोर येत आहे. राहुरी तालुक्यातील गुहा या गावाजवळ ही दुर्दैवी घटान घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तर एक महिला आणि मुलाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तर या अपघातीत चारिही मृत व्यक्ती एकाच घरातील असून ते मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh)असल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातात बाबत मिळालेली माहिती अशी की, नगर-मनमाड महामार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी असते. तर वर्दळ ही अधिक असते. मध्यप्रदेशातील भाविक त्यांच्या गाडीने शिर्डीहून शिंगणापूरकडे जात होते. यावेळी आज दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील गुहा गावाजवळ त्यांच्या गाडीची आणि बसची समोरासमोर भीषण धडक झाली. ज्यामध्ये कार गाडीचा चक्काचूर झाला. अपघात इतका भिषण होता की गाडीतील एक महिला आणि पुरूषाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बघ्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र या भीषण अपघातात एक महिला आणि पुरूषाचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या महिला आणि मुलाचाही नंतर मृत्यू झाला. दुर्दैवी बाब म्हणजे या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.