AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हुंड्यासाठी मारहाण, माहेरी ‘ते’ फोटो पाठवत पोलिसाच्या पत्नीची आत्महत्या

हुंड्यापायी आरोपीने नवविवाहित पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. नवऱ्याचा त्रास इतका वाढला, की लग्नानंतर काही दिवसातच ती माहेरी येऊन आपल्या आई-वडिलांसोबत राहू लागली.

हुंड्यासाठी मारहाण, माहेरी 'ते' फोटो पाठवत पोलिसाच्या पत्नीची आत्महत्या
विस्मया नायर आणि पती किरण कुमार - फोटो - फेसबुक
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 10:26 AM
Share

तिरुअनंतपुरम : सोनं, जमीन जुमला, आलिशान गाडी यासारख्या ‘भेटवस्तू’ लग्नात देऊनही मन न भरल्यामुळे पोलिसाकडून नवविवाहितेचा छळ सुरुच होता. शारीरिक अत्याचारांमुळे आपल्या शरीरावर झालेल्या जखमांचे फोटो वडिलांना पाठवत अखेर तरुणीने आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात तिच्या आयुष्याची अखेर झाली. (Harassed over Dowry Kerala Woman Vismaya Nair allegedly commits Suicide after sending photos of injuries to Family)

केरळातील कोलम जिल्ह्यात राहणाऱ्या विस्मया नायर हिचा विवाह मार्च 2021 मध्ये केरळ मोटर वाहन विभागात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या किरणकुमारशी झाला होता. मात्र हुंड्यात मिळालेली गाडी किरणला आपल्या लौकिकाला साजेशी वाटत नव्हती.

लग्नानंतर काही दिवसातच माहेरी

आणखी चांगली गाडी किंवा दहा लाख रुपयांची रोकड द्यावी, अशी मागणी तो विस्मयाच्या माहेरच्या माणसांकडे करत होता. त्यामुळे हुंड्यापायी त्याने नवविवाहित पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. नवऱ्याचा त्रास इतका वाढला, की लग्नानंतर काही दिवसातच ती माहेरी येऊन आपल्या आई-वडिलांसोबत राहू लागली.

वडिलांचा दावा काय?

“त्याला गाडी आवडली नाही आणि तो 10 लाख रुपये कॅश मागू लागला. मी हे आम्हाला जमणार नसल्याचं सांगितलं, तेव्हा त्याने माझ्या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने मध्यरात्री आमच्या घरी येऊन डोळ्यादेखतच विस्मयाला मारहाण केली” असा आरोप तिचे वडील त्रिविक्रम नायर यांनी केला आहे. किरण कुमारविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र तडजोडीनंतर ती मागे घेण्याची तयारी नायर कुटुंबाने दर्शवली होती.

Vismaya Nair

विस्मया नायर आणि पती किरण कुमार – फोटो – फेसबुक

परीक्षांपूर्वी सासरी नेले

22 वर्षीय विस्मया बीएएमसच्या अखेरच्या वर्षाला शिकत होती. अंतिम परीक्षांच्या आधी किरणने तिला घरी येण्याची विनंती केली. आई-वडिलांच्या मर्जीविरुद्धच ती सासरी परत गेली. त्यानंतर किरणने पुन्हा तिचा गाडीसाठी छळ सुरु केला. इतकंच नाही, तर तिला पालकांशी बोलण्यासही मज्जाव केला. विस्मयाने परीक्षा देऊ नये, अशी त्याची इच्छा होती. त्याने तिच्या फी भरण्यासही इन्कार केला. त्यामुळे विस्मयाला आपल्या आईकडे पैशांची मागणी करावी लागली.

बहिणीला जखमांचे फोटो पाठवले

रविवारी रात्री विस्मयाने आपल्या बहिणीला व्हॉट्सअॅप मेसेज करुन आपली बिकट स्थिती कथन केली. शिवीगाळ करुन पती किरण कुमार आपल्यावर शारीरिक अत्याचार करत आहे, असा आरोपही तिने मेसेजमध्ये केला होता. त्यामुळे शरीरावर झालेल्या जखमांचे फोटोही तिने पाठवले.

माहेरच्या कुटुंबाकडून हत्येचा आरोप

सोमवारी सकाळी विस्मयाच्या सासारहून माहेरी फोन आला. तुमच्या मुलीला रुग्णालयात दाखल केल्याचं सांगण्यात आलं. मात्र नायर कुटुंबीय हॉस्पिटलला पोहोचताच विस्मयाने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. विस्मयाच्या वडिलांनी मात्र ही आत्महत्या नसून किरणकुमारनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप लावला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी किरण कुमारला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

BMC च्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग, 22 वर्षीय तरुणाला पालघरमध्ये अटक

पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध, तरुणाची मुंबईला बोलावून हत्या, पतीसह चौघांना अटक

(Harassed over Dowry Kerala Woman Vismaya Nair allegedly commits Suicide after sending photos of injuries to Family)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.