AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीवर असलेल्या उमेदवारावर तलवारीसह धारदार शस्त्राने वार, माजी उपसरपंचासह 19 जण संशयित आरोपी

संदीप याच्या मृत्यूची घटना कळताच रुग्णालयात त्याच्या नातेवाइकांसह समर्थकांनी धाव घेतली. (Ichalkaranji Kabnur Youth Murder)

ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीवर असलेल्या उमेदवारावर तलवारीसह धारदार शस्त्राने वार, माजी उपसरपंचासह 19 जण संशयित आरोपी
| Updated on: Jan 24, 2021 | 4:16 PM
Share

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय वादामुळे एका तरुणाचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आल्याची धक्कादायक इचलकंरजीतील कबनूर या ठिकाणी घटना घडली आहे. संदीप सुरेश मागाडे असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यात मुख्य संशयित आरोपींमध्ये माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हे दोघेही मुख्य संशयित आरोपी असल्याचे म्हटलं जात आहे. (Ichalkaranji  Kabnur Youth Murder Due to political controversy)

संदीप मागाडे हा इचलकंरजीतील कबनुरातील भीमराज भवनजवळ राहत होता. काल रात्री कामावरून परतल्यानंतर तो कबनूर चौकात डेक्कन रोडवर थांबला होता. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्याला काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर मोपेडमधून आणलेल्या कोयत्यासह धारदार शस्त्राने वार करण्यात आले.

संदीप हा जखमी अवस्थेतच जीव वाचविण्यासाठी पळत सुटला. यानंतर आझादनगर परिसरात पुन्हा हल्लेखोरांनी पाठलाग करत त्याला गाठले. यावेळी तलवारीसह धारदार शस्त्राने त्याच्यावर तीक्ष्ण वार करण्यात आले. यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संदीप याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

संदीपच्या डोक्यात, खांद्यावर सुमारे सातहून अधिक तीक्ष्ण करण्यात आले होते. तसेच हल्ला रोखताना त्याचे हातावरही वर्मी घाव बसल्याचे तपासात निष्पन्न झाले. संदीप याच्या मृत्यूची घटना कळताच रुग्णालयात त्याच्या नातेवाइकांसह समर्थकांनी धाव घेतली.

हल्लेखोरांनी थरारकरित्या पाठलाग करून केलेल्या या घटनेमुळे कबनुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्याची घटना कळताच शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. हा हल्ला इतका जबरदस्त होता की, घटनास्थळी असलेल्या तलवारीची मूठ तुटली होती. घटनास्थळीच रक्ताने माखलेली तलवार, दगड पोलिसांना मिळून आले. तसेच एक मोपेड आणि एक मोटारसायकल अशा दोन दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

तब्बल 19 जण संशयित आरोपी

नुकतंच कबनूर ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मागाडे हा अग्रेसर होता. त्यातूनच हा खुनशी हल्ला झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळे हा मुख्य संशयित आरोपी आहे. त्यासोबतच रवी कांबळे, रमजान सनदी, मुजफर घुणके, असिफ खताळ,मोठा शाहरुख, आकाश कांबळे, राहुल शिंदे, संकेत कांबळे, मोहसीन सनदी, रोहन कुरणे, शाहरुख, राकेश कांबळे, ऋषिकेश वडर असे एकूण 14 जण संशयित आरोपी आहेत. त्याशिवाय अन्य 5 जणांची नावं समोर आलेली नाही. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान इचलकरंजी शहरात खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचा आलेख वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एका गुन्ह्याचा तपास पूर्ण होता न होताच दुसरा गुन्हा पोलिसांच्या समोर वाढून ठेवलेला असतो. यातच राजकीय वादामुळे झालेल्या खुनामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर कबनूर परिसरास मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Ichalkaranji Kabnur Youth Murder Due to political controversy)

संबंधित बातम्या : 

चिमुरड्याचा क्लचला धक्का लागून ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक! 2 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, घरातून फिरायला नेलं आणि…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.