AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघे मित्र एकत्र भेटले, आधी पार्टी केली, मग मित्राला थेट…., काय घडले नेमके?

त्याला घरी एकट्याला अस्वस्थ वाटत होते म्हणून त्याने मित्राला घरी बोलावले. पण टेन्शन दूर करण्याऐवजी मित्राने भलतेच केले.

दोघे मित्र एकत्र भेटले, आधी पार्टी केली, मग मित्राला थेट...., काय घडले नेमके?
जुन्या वादातून मित्राने मित्राला संपवले
| Updated on: May 26, 2023 | 11:01 AM
Share

बुंदेलखंड : माणसाच्या आयुष्यात सर्वात जवळच नातं मैत्रीचं असतं असं म्हटलं जातं. पण कधी कधी मित्रच मित्राचा शत्रू बनतो. अशीच एक घटना बुंदेलखंडमध्ये उघडकीस आली आहे. जुन्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना बुंदेलखंडमधील हमीरपूरमध्ये घडली. धर्मेंद्र सिंह असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी शेजाऱ्यांनी घराबाहेर मृतदेह पाहिल्यानंतर घटना उघडकीस आली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. मयत धर्मेंद सिंहचे वय 52 वर्षे होते. तो व्यवसायाने ई-रिक्षाचालक होता. त्याचे लग्न झालेले नव्हते. तो एकटाच राहत होता आणि ई-रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता.

मित्राला घरी बोलावून दारुची पार्टी केली

धर्मेंद्र सिंह खूप अस्वस्थ होता. त्यामुळे त्याने त्याच्या मित्राला फोन करून रात्री उशिरा दारू पिण्यासाठी घरी बोलावले. त्यानंतर काही वेळाने धर्मेंद्रचा मित्र गोविंद सिंग त्याच्या घरी पोहोचला. भरपूर दारू प्यायल्यानंतर दोघे गप्पा मारत होते. दारुच्या नशेत धर्मेंद्रचा मित्र गोविंद त्याला उलटसुलट बोलला. त्यानंतर जुन्या गोष्टींवरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. भांडणावेळी धर्मेंद्रच्या बोलण्याचा गोविंदला राग आला आणि त्याने धर्मेंद्रला बेदम मारहाण करत त्याची हत्यी केली.

सकाळी गावकऱ्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर घटना उघडकीस

दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी धर्मेंद्रचा रक्ताने माखलेला मृतदेह दाराबाहेर पाहिला आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. यानंतर तपास सुरू करत प्रकरणाचा छडा लावला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.