जालना : जालन्यात (Jalna Crime News) आयकराच्या छापेमारीमध्ये स्टिल व्यावसायिकाचा बाजार उठलाय. कोट्यवधींची बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पण ही छापेमारी यशस्वी व्हावी म्हणून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं नियोजन, प्लानिंग फारच जबरदस्त होतं. कुणालाही या छापेमारीची (IT Raid) कानोकान खबर लागू नये, यासाठी आयकर विभागाने कमालीची गोपनीयता बाळगली होती. विशेष म्हणजे छाप्यावेळी तब्बल 120 गाड्यांचा ताफा घेऊन अधिकारांनी धाड टाकली. अडीचशेहून अधिकर आयकर विभागाचे (Income Tax) लोक छापेमारीच्या कारवाईत सहभागी होते. या सगळ्यांना घेऊन जाणं, छापेमारीसाठी जातोय, हे कुणाला कळू न देणं, तसं अवघडच होतं. पण तरिही हे एका कारणामुळे शक्य झालं. आयकराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लग्नाचे वऱ्हाडी आहोत, असं भासवत छापेमारीचा प्लान आखला होता. ऐकयला जितकं आश्चर्यकारक वाटतंय, तितकंच आश्यर्य ही छापेमारी यशस्वी झाल्यानंतर व्यक्त केलं जातंय.