AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याची अंत्ययात्रा संपताच बायकोला अटक, प्रियकराच्या मुसक्या आधीच आवळल्या; जळगावात का होतेय या घटनेची चर्चा?

जळगावच्या अंमळनेर तालुक्यात एका प्रेमप्रकरणामुळे खून झाला. पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीचा खून केला. पती तुषार चौधरी याचा मंगरूळ येथे दगडाने मारून खून केला. पत्नी पूजा आणि प्रियकर सागर यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी मोबाईल फोन, लोकेशन आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपासून गुन्हा उघड केला.

नवऱ्याची अंत्ययात्रा संपताच बायकोला अटक, प्रियकराच्या मुसक्या आधीच आवळल्या; जळगावात का होतेय या घटनेची चर्चा?
नवऱ्याची अंत्ययात्रा संपताच बायकोला अटक
| Updated on: Dec 07, 2024 | 11:31 AM
Share

प्रेम कुणावरही होऊ शकतं. प्रेम करणं काही वाईट नाहीये. पण प्रेमाच्या नावाखाली अनैतिक संबंध ठेवणं चूक आहे. त्यात जर तुम्ही गुन्हा करत असाल तर ते अत्यंत चूक आहे. असे अनैतिक संबंध किंवा गुन्हा हा कधीच लपून राहत नाही. आपण जे केलंय ते कुणालाच कळणार नाही, आपण खूप हुशार आहोत असं जर समजत असाल तर ती तुमची चूक आहे. कारण आज ना उद्या गुन्हा हा उघड होतोच आणि त्याचं शेवटचं स्थान हे तुरुंग असतं. जळगावातही प्रेमप्रकरणातून असाच गुन्हा घडला. शेवटी जे व्हायचे तेच झाले. अखेल गुन्ह्याला वाचा फुटली आणि आरोपीला अटक करण्यात आली.

जळगावाच्या अंमळनेर तालुक्यातील पोलीस आपल्या कामात नेहमी प्रमाणे बिझी होते. अचानक फोनची घंटी वाजली. आणि काही तरी घडल्याची माहिती कानावर आली. त्या सरशी पोलीस थेट घटनास्थळी गेले. समोर जे दिसलं आणि चौकशीतून जे समोर आलं, त्याने पोलीसही अवाक् झाले. अमळनेर तालुक्यातील मारवड गावातील तरुणाचा मंगरूळ एमआयडीसीत डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना समोर आली आहे. तुषार चिंधु चौधरी असे मयत तरुणाचे नाव आहे. तो 37 वर्षाचा आहे. मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराने हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.

काय घडलं?

तुषार हा मूळचा मारवड येथील राहणारा आहे. तो 5 तारखेला रात्री उशिरापर्यंतघरी आला नाही म्हणून त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तुषार मंगरूळ येथे जखमी अवस्थेत पडला असल्याचे समजले. तुषारच्या कपाळावर डोक्यावर दगडाने वार केलेला होता. त्याच्या डाव्या कानाजवळ आणि डाव्या डोळ्याजवळ गंभीर जखमा होत्या. पोलीस ठाण्याचे प्रभारी डीवायएसपी धनंजय वेरूळ यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

अनैतिक संबंधातून हा खून झाल्याच पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराने खून केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दोन मुलं असूनही…

तुषारला दोन मुलं आहेत. तो पत्नी पूजासह राहत होता. पूजाचे सागर चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण होतं. सागर हा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा राहणारा आहे. सागर अनेकवेळा अमळनेरला येऊन पूजाला घेऊन बाहेर जात होता. विशेष म्हणजे सागरचं लग्न झालेलं आहे. त्याला एक मुलगी आहे. पण त्याची बायको त्याच्यासोबत राहत नव्हती. त्यामुळे त्याने पूजाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पूजाही लग्नाला तयार झाली होती. पण तुषार हा आपल्यात अडथळा बनेल म्हणून त्याने तुषारचा काटा काढायचा निर्णय घेतला. पूजा मात्र सागरला मारू नको असं सांगत होती. तरीही सागर निर्णयावर ठाम होता. पूजाने तुषारला बोलावून घेतलं होतं. माझा नातेवाईक येत आहे. त्याच्यासोबत लग्नाची पत्रिका वाटायला जा, असं तिने तुषारला सांगितलं. त्यानंतर सागर आला आणि तो तुषार सोबत गेला. दोघेही दारू प्यायले. त्यानंतर दोघे मंगरुळला गेले. तिकडे गेल्यावर सागरने तुषारच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अंत्ययात्रा होताच…

पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मोबाईल फोन, लोकेशन आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपसले. त्यानंतर एक पथक दोंडाईचा येथे पाठवले. सागरने मोबाईल बंद करून ठेवला होता. त्याचे मोबाईलचे दुकान होते. पण हत्येनंतर अवघ्या सहा तासातच पोलिसांनी त्याच्यावर त्याला अटक केली. तुषारची अंत्ययात्रा झाल्यावर पोलिसांनी पूजालाही ताब्यात घेतलं. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.