AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एटीएम कार्डसारखे यंत्र, मोबईलमध्ये फोटो काढले, पोलीस भरती परीक्षेत कॉपी, जळगावमध्ये 2 मुन्नाभाईंना बेड्या

पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत दोन बहाद्दरांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय आल्यामुळे या दोघांनाही पकडण्यात आले. योगेश रामदास आव्हाड, प्रतापसिंग बालोद अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एटीएम कार्डसारखे यंत्र, मोबईलमध्ये फोटो काढले, पोलीस भरती परीक्षेत कॉपी, जळगावमध्ये 2 मुन्नाभाईंना बेड्या
copy in exam
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 4:11 PM
Share

जळगाव : अभिनेता संजय दत्तने आपल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात परीक्षा देताना अगदी स्मार्ट पद्धतीने कॉपी केल्याचे आपल्याला माहिती आहे. पण असाच काहीसा प्रकार जळगाव पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत प्रत्यक्षात घडला आहे. पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत दोन बहाद्दरांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय आल्यामुळे या दोघांनाही पकडण्यात आले. योगेश रामदास आव्हाड, प्रतापसिंग बालोद अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

प्रश्नपत्रिकेचे मोबाईलमध्ये फोटो काढले 

कॉपी करताना अटक करण्यात आलेला योगेश आव्हाड नाशिकमधील तर प्रतापसिंग गुलचंदहा औरंगाबाद जिल्ह्यातील रहीवाशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी कॉलेज या परीक्षा केंद्रावर योगेश रामदास आव्हाड याने केंद्राच्या आवारातील सीसीटीव्ही व्हिडिओ कॅमेरे तसेच तपासणी करणाऱ्या पोलिसांची नजर चुकवली. त्याने कॉपी करण्यासाठी मोबाईल परीक्षा केंद्रात नेला होता. प्रश्नपत्रिका मिळताच त्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून मित्राच्या मोबाईलवर पाठवले. त्यानंतर मित्राने प्रश्नांची उत्तरे आव्हाडला पाठवली. ढळढळीतपणे कॉपी करुन आव्हाड प्रश्नपत्रिका सोडवत होता. हा प्रकार सहायक पोलीस निरीक्षक देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

एटीएम कार्डच्या आकाराचे यंत्र वापरले 

तर दुसरीकडे विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रतापसिंग बालोद याने एटीएम कार्डच्या आकाराचे एक डिव्हाईस सोबत आणले होते. त्यात मेमरी कार्ड होते. ते ब्लूटूथने कनेक्ट करून स्पीकरमधून आवाज दिला होता. लहान आकाराचा स्पीकर त्याने कानात लपवला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव त्याला ऐकू येईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. प्रतापसिंग हा परीक्षा केंद्रावर आला तेव्हा त्याने बनियनमध्ये डिव्हाइस लपवले होते. पण परीक्षा केंद्राच्या आत जाण्याआधीच त्याचा हा प्रकार उघडकीस आला.

दोघांवरही गुन्हा दाखल, चौकशी सुरु 

या दोन्ही कॉपीबहाद्दरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांचीही चलाखी पोलिसांनी ओळखल्यामुळे त्यांचा हा डाव उधळून लावण्यात आला. सध्या दोघांवरदेखील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.

इतर बातम्या :

अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार; किरीय सोमय्यांच्या इशाऱ्याने खळबळ

‘मराठी माणूस नॉट अलाऊड’ म्हणणाऱ्यांवर मीरा रोडमध्ये अखेर गुन्हे दाखल, मराठी एकीकरण समितीच्या संघर्षाला यश

काहीही झालं तरी विराटला IPL ट्रॉफी जिंकवून द्यायचीच, RCB खेळाडू करतायत जीवाचं रान, प्लॅन ठरला!

(jalgaon police recruitment test student arrested while cheating in exam case registered)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.