बायका, लहान मुलं काहीच पाहिलं नाही.. वीट, दगड, काठ्या घेऊन तुटून पडले.. कांदिवलीत नेमकं काय घडलं ?
कांदिवली पश्चिमेकडील एका भागांत दोन गटांत तूफान राडा झाला. बॅट्स, हॉकी, वीट, दगड घेऊन दोन गटांतील लोक एकमेकांवर तुटून पडले. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यूही झाला. हा वाद नेमका कशावरून पेटला, झालं तरी काय ?
मुंबई उपनगरांपैकी एक असलेलं कांदिवली तसं शात शहर, फार चर्चेत नाही, काही नाही… पण आज सकाळपासून या शहराचं नाव जिकडे तिकडे ऐकायला मिळतंय, पण ते कोणत्याही चांगल्या कारणामुळे नव्हे तर तिथे झालेल्या एका राड्यामुळे. कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा पोलीस चौकीपासून काही अंतरावर दोन गटांतील वादाने बघता बघता रौद्र रूप धारण केलं आणि लोकांवरू काड्या, दगड, विटा, हॉकी स्टिक्स यांचा वकर्षाव होऊ लागला. एका कराणावरून झालेल्या वदानंतर दोन गटांतील लोकं एकमेकांच्या जीवाचे दुश्मन बनून तुटून पडले, तूफान हाणामारी, तुंबळ युद्धच जणू झाले.या दुर्दैवी घटनेत अनेक जण जखमी तर झालेच पण एका वयोवृद्ध इसमाचा मृत्यूही झाला.
लालजी पाड्यात काय घडलं ?
दोन गटांमधील विट, बॅट, हॉकी काठ्या वापर करून होणारी लढाई मुंबईसारख्या शहरातही पाहायला मिळाली आहे. स्टिक काठ्यांचा वापर करत तुफान हाणामारी झाली. कांदिवली हत्याकांडाचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली लालजी पाडा पोलीस चौकीपासून काही अंतरावर यादव आणि चौहान दोन गटांमधील काठ्या आणि रॉडने मारामारी झाली, त्याचा व्हिडीओही समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, दुकान रिकामे करण्यावरून हा वाद आणि खून झाला.
यादव आणि चौहन यांच्यात अनेक महिन्यांपासून हा वाद सुरू होता, त्याच मुद्यावरू दोन्ही कुटुंबात बेदम मारामारी झाली. बॅट, हॉकी स्टिक, लाकडी काठ्या, विटा आणि दगडांचा वापर करून एकमेकांना अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत मारण्यात आलं. त्यात वयोवृद्ध नागरिकालाही सोडलं नाही. या घटनेमध्ये अनेक जण जखमी झाले , त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यानच 65 वर्षांचे राम लखन यादव यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी या प्रकरणात समाजवादी पक्षाच्या नेत्यासह चार जणांना अटक केली आहे. कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी आधी क्रॉस केस नोंदवली होती पण वृद्ध व्यक्तीच्या हत्येनंतर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकान रिकामे करण्यावरून4 तारखेला हाणामारी झाली ज्यामध्ये 7 ते 8 लोक जखमी झाले. एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात संजय चौहान, अमरनाथ चौहान, अवधेश चौहान आणि कमलेश चौहान अशी चार जणांना अटक केली आहे. तर इतर 15 ते 16 आरोपी वाँटेड आहे, कांदिवली पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, असे पोलिसांनी सांगितलं.
कांदिवली लालजी पाडा यूपी बिहार झाला आहे- मनसेची एंट्री
कांदिवली हत्या प्रकरणात मनसेची एंट्री झाली आहे. मनसे विभागप्रमुख दिनेश साळवी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कांदिवलीतील लालजी पाडा, संजय नगर परिसर म्हणजे यूपी बिहार झाला आहे, असे ते म्हणाले. हे लोक कांदिवलीमध्ये गोळीबार, ड्रग्ज आणि मारामारीसारख्या घटना घडवतात आणि पोलिस त्याकडे लक्ष देत नाहीत. सर्व आरोपींचे रेकॉर्ड आहेत, आरोपींना हद्दपार करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.