AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | लातुरात भीषण अपघात, भरधाव वेगातील बाईक पुलाला धडकली, कठड्याचा पाईप पोटात घुसल्याने तरुणाचा मृत्यू

लातूर (Latur) जिल्ह्यातल्या हाळी-हंडरगुळी गावाजवळ मोटारसायकलवरील दोन तरुणांचा भीषण अपघात (Terrible Accident) झाला. भरधाव वेगात असलेले हे बाईकस्वार अरुंद पुलाला धडकल्याने हा भीषण अपघात घडला. त्यांची मोटारसायकल इतकी वेगात होती की पुलाला धडकल्याने पुलाच्या कठड्याला लावण्यात आलेला संरक्षक पाईप थेट तरुणाच्या पोटात घुसला.

VIDEO | लातुरात भीषण अपघात, भरधाव वेगातील बाईक पुलाला धडकली, कठड्याचा पाईप पोटात घुसल्याने तरुणाचा मृत्यू
Latur Accident
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 1:43 PM
Share

लातूर : लातूर (Latur) जिल्ह्यातल्या हाळी-हंडरगुळी गावाजवळ मोटारसायकलवरील दोन तरुणांचा भीषण अपघात (Terrible Accident) झाला. भरधाव वेगात असलेले हे बाईकस्वार अरुंद पुलाला धडकल्याने हा भीषण अपघात घडला. त्यांची मोटारसायकल इतकी वेगात होती की पुलाला धडकल्याने पुलाच्या कठड्याला लावण्यात आलेला संरक्षक पाईप थेट तरुणाच्या पोटात घुसला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे.

नेमकं काय घडलं?

हाळी-हंडरगुळी गावाजवळ दोन तरुण मोटारसायकलवरुन भरधाव वेगात जात होते. यावेळी अरुंद पुलावर येताच बाईकस्वाराचा बाईकवरील ताबा सुटला आणि बाईक थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. यादरम्यान, पुलाच्या कठड्याला लावण्यात आलेला संरक्षक पाईप मागे बसलेल्या शंकर शिंदे (वय 13) या तरुणाच्या पोटात घुसला. तर, अजित मिश्रा ( वय 21) या बाईकस्वारही गंभीर जखमी झाला.

कठड्याचा पाईप शंकरच्या अक्षरश: आरपार घुसला होता. परिस्थिती अशी होती की लोकांना देखील त्याची मदत करता आली नाही. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. अखेर पोलिसांनी गॅस कटरच्या सहाय्याने पाईप कट करुन या तरुणाला तात्काळ उदगीरच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अजितवर सध्या उपचार सुरु आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात, एकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन वाहनांचा एक विचित्र अपघात घडला आहे. पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरामध्ये घडलेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राम बाळासाहेब बागल असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत राम बागल आणि किशोर बागल हे चुलत भाऊ आहेत. दोघेजण बुलेट दुचाकीवरुन जात होते. किशोर बुलेट चालवत होता. त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत बुलेट विरुद्ध दिशेने नेली. रस्त्यात विरुद्ध दिशेला आरोपी सुरज आणि सुमित यांनी त्यांची कार पार्क केली होती. त्यांनी कारचा डाव्या बाजूचा दरवाजा उघडला असता बुलेटची दरवाजाला धडक बसली. त्यामुळे बुलेटवर मागच्या सीटवर बसलेला राम रस्त्यावर पडला. त्यावेळी विरुद्ध दिशेने एक टेम्पो येत होता. त्या टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने राम याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमरात कैद झालीये.

संबंधित बातम्या :

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Jodhpur Car Accident | भरधाव कारने आठ जणांना चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा अपघात

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.