AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime : महिलांनो सावधान तुम्हीसुद्धा ही एक चूक केलीत तर… महाराष्ट्रातील भामट्या कॅब ड्रायव्हरचा पर्दाफाश!

Maharashtra Crime News : महाराष्ट्रातील एका कॅब ड्रायव्हरने वेगळाचा उद्योग सुरू केला होता. आता त्यांचा भांडाफोड झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

Crime : महिलांनो सावधान तुम्हीसुद्धा ही एक चूक केलीत तर... महाराष्ट्रातील भामट्या कॅब ड्रायव्हरचा पर्दाफाश!
| Updated on: Jun 14, 2023 | 7:10 PM
Share

परभणी : कोरोना महामारीमुळे अनेकजणांचे रोजगार गेले होते. सगळ्याच क्षेत्रांना या महामारीचा मोठा फटका बसला. यामध्ये आयटी कंपन्यांना असलेल्या कॅबही वर्क फ्रॉममुळे बंद झाल्या. आता परत एकदा सर्व काही सुरळित होण्याच्या मार्गावर आहे. मात्र यादरम्यान महाराष्ट्रातील एका कॅब ड्रायव्हरने वेगळाचा उद्योग सुरू केला होता. आता त्यांचा भांडाफोड झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

आरोपी विनोद किशनराव मुंडे कॅबमध्ये हा फेसबूकवरून अनोळखी महिलांच्या अकाउंटवर एक लिंक पाठवत होता. या लिंकवर समोरील महिलांनी क्लिक केलं तर त्यांंचं अकाउंट हॅक ह्यायचं. पीडित महिलांच्या अकाउंटचा अॅक्सेस त्याच्याकडे जात होता. त्यानंतर आरोपी तीच लिंक पीडितेच्या मित्रांना-मैत्रिणींना पाठवत होता. मित्राने किंवा मैत्रिणीनेच लिंक शेअर केली म्हणून त्याही ती लिंक ओपन करायच्या.

अशा प्रकारे आरोपी  विनोद मुंडे महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. त्यानंतर तो संबंधित महिलांचे फोटो आणि अश्लील व्हिडीओ मॉर्फ करून ते अश्लील वेबसाईटवर अपलोड करण्याची धमकी द्यायचा. जर फोटो अपलोड नसतील होऊ द्यायचे तर ब्लॅकमेल करून त्यांना 5 ते 10 हजार रूपये मागायचा. महिलांचे राहणीमान पाहून त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधत तशा प्रकारे पैशांची मागणी करायचा.

आरोपीला वाटायचं की जास्त पैसे न मागता त्यांना कमी मागायाचे म्हणजे ते फोटो अपलोड होऊ नयेत या भीतीने त्या पोलिसांकडे तक्रार करणार नाहीत. मात्र इथेच तो फसला कारण त्याच्याविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन आणि मुंबईतील एका महिलेने तक्रार केली.

दरम्यान, तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत त्याला लातूरमधून बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने याआधी 24 महिलांना ब्लॅकमेलकरून पैसे उकळल्यांची माहिती समोर आली. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.