आधी मुंबई पोलीस दलात काळ गाजवला, आता प्रदीप शर्मांसह 5 माजी पोलीस अधिकारी एकाच जेलमध्ये

दीप शर्मा हे NIA च्या कोठडीत होते, मात्र आजच त्यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व आरोपी एकाच कारागृहात बंद राहणार आहेत.

आधी मुंबई पोलीस दलात काळ गाजवला, आता प्रदीप शर्मांसह 5 माजी पोलीस अधिकारी एकाच जेलमध्ये
pradeep sharma
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 4:56 PM

मुंबई : अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर झाडाझडती सुरु आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने अनेक जणांवर अटकेची कारवाई केली. यामध्ये मुंबई पोलिसातील सुनील माने, रियाझ काझी,निलंबित कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि त्यानंतर माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा. NIA ने अटक केलेले हे पाचही माजी पोलीस अधिकारी आता तळोजा कारागृहात पोहोचलेत. प्रदीप शर्मा हे NIA च्या कोठडीत होते, मात्र आजच त्यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व आरोपी एकाच कारागृहात बंद राहणार आहेत. (Encounter specialist Pradeep Sharma, Sachin Vaze, Riaz Kazi, Sunil Mane and Vinayak Shinde all Mumbai cops in same Taloja jail in Mansukh Hiren murder and Antilia bomb scare case )

आधी NIA कोठडीत, आता न्यायालयीन कोठडीत

अँटिलिया स्फोटके प्रकरणं आणि त्यादरम्यान मनसुख हिरेनची हत्या झाल्यामुळे, तपासादरम्यान NIA ने मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझेला NIA ने अटक केली होती. मात्र तपासाचा फेरा जसाजसा पुढे सरकला तसा यात अनेक नावं समोर आली आणि अखेर टॉप कॉप समजल्या जाणाऱ्या प्रदीप शर्मांना NIA कडून बेड्या ठोकण्यात आल्या. शर्मा 12 हून अधिक दिवस NIA च्या कोठडीत होते, मात्र आज त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. NIA ने स्वतःहून कोर्टात सांगितलं की प्रदीप शर्मा आणि संतोष शेलार, आनंद जाधव यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात यावी.

मास्टरमाईंड कोण?

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हे मास्टरमाईंड होते असा दावा NIA ने यापूर्वी कोर्टात केला आहे. या दोघांच्या संगण्यावरूनच मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली आणि त्याबदल्यात आरोपींना रोख रकमेच्या स्वरूपात पैसेही देण्यात आल्याचे NIA ने कोर्टात सांगितलं. शर्मा यांचा निकटवर्तीय समजला जाणारा संतोष शेलार आणि त्याचा साथीदार आनंद जाधव यांनाही आज न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय.

प्रदीप शर्मा म्हणाले ते जेल नको

प्रदीप शर्मा यांनी आज कोर्टात एक अर्ज केला, ज्यामध्ये विशिष्ट कारागृहात मला पाठवण्यात यावं असं म्हटलं होतं. मात्र कोर्टाने या अर्जावर संबंधित कारागृह प्रशासन विचार करेल असं म्हटलं. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार त्यांना तळोजा किंवा ऑर्थर रोड कारागृहात जायचं न्हवतं, त्यांना ठाणे कारागृहात जायची इच्छा होती. मात्र कोर्टाने त्यांच्या या मागणीचा विचार केला नाही.

सध्या तळोजा कारागृहात या प्रकरणातील सर्व आरोपी बंदिस्त आहेत. ज्यामध्ये सचिन वाझे, रियाझ काझी, सुनील माने, विनायक शिंदे, नरेश गोर आणि आजपासून प्रदीप शर्मा, संतोष शेलार आणि आनंद जाधव यानाची तळोजामध्ये पाठवण्यात आलं. NIA ने सध्या फक्त मनीष सोनी आणि सतीश मुठेकरी या दोन आरोपींची कोठडी 1 जुलैपर्यत वाढवून घेतली आहे. अजूनही या दोघांकडून महत्वाची माहिती मिळू शकते असे NIA चं म्हणणं आहे. पण वाझे आणि शर्मा या सुपरकॉप समजल्या जाणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्यांना तळोजा तुरुंगाचा रस्ता दाखवण्यात आला.

संबंधित बातम्या 

प्रदीप शर्मांसह इतर आरोपींचे डीएनए नमुने जमा, पुराव्यांसोबत पडताळणी होणार

Special Report | मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मांचा नेमका रोल काय?

Special Report | मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील माने आणि विनायक शिंदे यांची नेमकी भूमिका काय?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.