बोरीवलीत पालिकेच्या इंजिनिअरवर गोळीबार, डी गँगच्या गुंडाला उत्तर प्रदेशातून अटक

गेल्या आठवड्यात बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोरील सर्व्हिस रोड श्री कृष्णा कॉम्प्लेक्ससमोर पीडब्ल्यूडी इंजिनिअर दीपक खांबित (वय 45 वर्ष) यांच्यावर गोळीबार झाला होता

बोरीवलीत पालिकेच्या इंजिनिअरवर गोळीबार, डी गँगच्या गुंडाला उत्तर प्रदेशातून अटक
बोरीवलीत अभियंत्यावर गोळीबार
गोविंद ठाकूर

| Edited By: अनिश बेंद्रे

Oct 05, 2021 | 10:36 AM

मुंबई : मुंबईच्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अभियंत्यावरील गोळीबार प्रकरणी मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातून डी गँगच्या गुंडाला अटक केली आहे. आरोपीला मुंबईतील कस्तुरबा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी गोळीबाराचा प्रकार घडला होता.

काय आहे प्रकरण?

गेल्या आठवड्यात बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोरील सर्व्हिस रोड श्री कृष्णा कॉम्प्लेक्ससमोर पीडब्ल्यूडी इंजिनिअर दीपक खांबित (वय 45 वर्ष) यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात मीरा भाईंदर गुन्हे शाखा युनिटने मुख्य आरोपी अमित सिन्हा (41 वर्ष) याला अटक केली. अमित सिन्हा छोटा राजन टोळीसाठी काम करत असल्याची माहिती आहे.

आरोपीला काल न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोळीबार प्रकरणी एक आरोपी अद्यापही फरार आहे.

कोण आहे अमित सिन्हा?

आरोपी अमित सिन्हा 2010 पासून डीके रावसाठी काम करत होता. मुंबई पोलिसांच्या झोन 12 ने आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार केली होती. गुन्हे शाखेच्या तपासात अमित सिन्हाचे नाव समोर आले होते. ज्याच्या आधारे अमितला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार अमित टोळीच्या म्होरक्याच्या इशाऱ्यावर काम करतो. ठाकूर टोळीच्या आदेशावरुन अमितने अभियंत्यावर गोळीबार केला होता.

गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्य आरोपी अमित सिन्हा उत्तर प्रदेशात पळून गेला होता. तर दुचाकीस्वार दुसरा आरोपी बबलू खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

अभियंत्यावर गोळीबाराचे कारण काय?

महापालिका अभियंता दीपक खांबित भाईंदर नगरपालिकेच्या निविदेबाबत स्वतःची मनमानी करत असल्याचा दावा करत ठाकूर टोळी खूप संतापली होती. याचा बदला घेण्यासाठी अभियंत्याला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती. भाईंदर नगरपालिका कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन दुचाकीस्वार पांढऱ्या रंगाच्या रेनकोटमध्ये अभियंत्याची वाट पाहताना दिसत होते. मात्र तिथे संधी न मिळाल्याने त्यांनी अभियंत्याचा पाठलाग केला आणि कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याच्या स्विफ्ट डिझायर कारवर दोन राऊंड फायर करुन पळून गेले होते.

संबंधित बातम्या :

मुंबईकरांना धडकी भरवणारी घटना, बोरिवलीत अभियंत्याच्या कारवर भरदिवसा गोळीबार, भयानक थरार

तब्बल 21 महिलांवर बलात्कार अन् हत्या, अंतर्वस्त्रांची चोरी करणाऱ्या उमेश रेड्डीची थरकाप उडवणारी कथा, शिक्षाही तशीच !

अनैतिक संबंधांचा संशय, 50-60 जणांच्या टोळक्याने महिला आणि तरुणाला निर्वस्त्र करत गावात फिरवलं

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें