पंकजा मुंडेंच्या वरळी कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी, तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा

खदखद व्यक्त करण्यासाठी आणि एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मंगळवारी वरळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते.

पंकजा मुंडेंच्या वरळी कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी, तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा
pankaja munde

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत केलेल्या गर्दी प्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्या वरळी येथील कार्यालयात मंगळवारी शेकडो कार्यकर्ते जमले होते. यासंदर्भात तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांचं नाव डावलण्यात आल्याच्या कारणांवरुन समर्थकांमध्ये नाराजी होती. खदखद व्यक्त करण्यासाठी आणि एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी वरळीत पंकजा मुंडेंच्या कार्यालयात मंगळवारी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. पंकजा मुंडे यांनी वरळीत यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. गर्दी जमवल्या प्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188, 269, 37 (3), 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींना नोटीस देऊन पोलिसांनी सोडलं.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवतानाच महाराष्ट्र भाजपातील राजकारणावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मात्र, पक्षातच सक्रिय राहण्याचे संकेतही त्यांनी दिले. “मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता. पुढेही खडतर आहे. मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते. पण मी संपलेली नाही. मी आहे. मी तुमच्या जीवावर आहे” असं पंकजा म्हणाल्या.

“अविचाराने कोणताही निर्णय का घ्यायचा?”

यावेळी पंकजांनी कार्यकर्त्यांना भविष्याबाबत सूचक संकेतही दिले. “योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते माझ्या भावांनो. अविचाराने कोणताही निर्णय का घ्यायचा? आपण सात्विक माणसं आहोत. 90 टक्के वारकरी आहोत. माझा पराभव झाला. कुणाचा पराभव झाला नाही? महाराष्ट्रात अनेकांचा पराभव झाला. मी त्याने हरले नाही. प्रीतम मुंडे नाव असताना, त्या लायक असताना त्यांचं मंत्रिपद झालं नाही. पण डॉ. कराडांचं झालं. माझं वय 42. त्यांचं 65 आहे. मी 65 वर्षाच्या मंत्रिपदावर असलेल्या माझ्या समाजाच्या माणसाचा अपमान करावा, हे संस्कार आहेत का माझे? मी का त्यांच्या पदाला अपमानित करू?”असा सवा लही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह, पंकजा मुंडेंचा थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा?

दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा

मी केंद्रातलं मंत्रीपद नाकारलं, पंकजा मुंडेंचा मुंबईत गौप्यस्फोट, वाचा काय काय म्हणाल्या?

(Pankaja Munde Worli office supporters crowd 42 booked along with three Organizers)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI