इगतपुरी-कसारा स्थानकांदरम्यान पुष्पक एक्स्प्रेसवर दरोडा, तरुणीचा विनयभंग, दोघांना अटक

Rape in Mumbai Lucknow express train | लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दरोडा पडला. सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करत प्रवाशांना लुटले. 15 ते 20 प्रवाशांना यावेळी लुटण्यात आले. तसेच ट्रेनमध्ये असणाऱ्या 20 वर्षांच्या तरुणीवर दरोडेखोरांनी अत्याचार केले.

इगतपुरी-कसारा स्थानकांदरम्यान पुष्पक एक्स्प्रेसवर दरोडा, तरुणीचा विनयभंग, दोघांना अटक
प्रातिनिधिक फोटो

कल्याण: लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. इगतपुरी ते कसारा या स्थानकांदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून आता पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दरोडा पडला. सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करत प्रवाशांना लुटले. 15 ते 20 प्रवाशांना यावेळी लुटण्यात आले.  शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोचली. त्यावेळी ट्रेन स्लो असल्याने सात ते आठ जण ट्रेनमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. दरोडेखोरांचा हातात फाइटर आणि बेल्ट होता. अनेक प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले. मात्र, 15 ते 20 प्रवासी सध्या समोर आले आहेत. धक्कादायक म्हणजे एका प्रवाशी महिलासोबत दरोडेखोरांनी छेडछाड सुरू केली. या 20 वर्षीय तरुणीची विनयभंग झाल्याची माहितीसुद्धा पोलिसांनी दिली आहे. काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. दोन दरोडेखोर कल्याण ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे उर्वरित आरोपींच्या पोलिस शोध घेत आहेत. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे . या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आला आहे.

नागपूरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गुन्ह्यात एकूण सात आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी सातपैकी चार आरोपींना अटक केली असून अन्य तीन संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे नागपूर शहरात नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील इससानी मिहान मार्गावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी अचानक तिथे पोहचलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी मित्राला मारहाण करून मुलीवर सामूहिक बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसांकडे आली होती. पण पोलीस तपास करत असताना मुलीच्या मित्रानेच पैसे घेऊन मुलांना बोलावले असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. या गँगरेप प्रकरणात एकूण सात आरोपी असून यात मुलीच्या मित्रासह चार जणांना अटक करण्यात आली आहे तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी मुलीची मेडिकल चाचणी करून घेतली असून ती ठीक असल्याचं सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड मुलीचा मित्र असल्याचे उघड झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या:

नागपूरमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, दोन महिलांची सुटका

मुलीचा अपघात, उपचारासाठी पैसे पाठवा, पिंपरीतील चार नगरसेवकांना गंडा, आरोपीला अटक

लहान मुलांच्या भांडणाचे कारण, पिंपरीतील उच्चभ्रू वसाहतीत भाडोत्री गुंडांना बोलावून शेजाऱ्यांना मारहाण

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI