सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीचं धाडसत्र, हवालातील रकमेचा वापर केल्याचा संशय

गजानन उमाटे

गजानन उमाटे | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Dec 01, 2022 | 4:34 PM

सुपारी व्यापारामध्ये आर्थिक घोळ केल्याची माहिती मिळते. मस्कासाथ आणि इतवारी परिसरातही ही कारवाई करण्यात आली.

सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीचं धाडसत्र, हवालातील रकमेचा वापर केल्याचा संशय
नागपुरात ईडीची कारवाई

नागपूर – नागपुरातील चार मोठ्या सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीने धाड टाकलीय. आज पहाटे सहा वाजता वीसपेक्षा जास्त ईडीचे अधिकारी नागपुरातील इतवारी मस्कासाथ परिसरातील आले. त्यांनी धाडसत्र सुरु केलं. यात मस्कासाथ परिसरातील गोयल ट्रेडर्स या सुपारी व्यापाऱ्याचाही समावेश आहे. सीआरपीएफ जवानांच्या चोख सुरक्षा व्यवस्थेत ही धाड आणि सर्च ॲापरेशन राबवण्यात आलंय. नागपूर हे मध्यभारतातील सर्वात मोठं सुपारी विक्रीचं केंद्र आहे. देशातील मोठे सुपारी व्यापारी नागपुरात आहे.

सुपारीच्या व्यापारात हवालाचा पैसा वापरला जात असल्याचा ईडीला संशय असल्याने ही धाड टाकण्यात आलीय. या धाडसत्रात सुपारी व्यापारातील काही महत्त्वाची कागदपत्र ईडीच्या हातात लागलीयं. या धाडसत्रामुळे इतर व्यापाऱ्यांचे धाबे दणाणलेय.

नागपुरात चार वेगवेगळ्या ठिकाणी ईडीनं छापेमारी केली. इतवारी परिसरातील व्यापाऱ्यांवर ईडीनं छापे टाकले. ब्लॅक मनीचा वापर होत असल्याचा संशय ईडीला आहे.

सकाळी सहा वाजतापासून ईडीची कारवाई सुरू झाली. सुपारी व्यापारामध्ये आर्थिक घोळ केल्याची माहिती मिळते. मस्कासाथ आणि इतवारी परिसरातही ही कारवाई करण्यात आली.

गोएल ट्रेडर्स यांचं काम चालतं. सकाळपासून ही कारवाई सुरू आहे. कागदपत्र तपासण्याचं काम ईडीचे अधिकारी करत होते.

नागपूर हे कच्च्या सुपारीच्या विक्रीचं मोठं हब आहे. मोठमोठे व्यापारी या ठिकाणी आहेत. यापैकी काही व्यापाऱ्यांवर ईडीनं छापा टाकला. सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलेत.

प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, हेमंत कुमार गुलाबचंद, वसीम बावला, दिग्वीजय ट्रान्सपोर्टचे हिमांसू भद्रा आदींवर छापे मारण्यात आलेत.

१८ घरं व प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. नागपूर विभागातील या कारवाईत १३० अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI