AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरात डान्सिंग चोराची धूमाकूळ, डान्स करत वाहनांमधील पेट्रोल चोरतो

पहाटेच्या सुमारास हा चोरटा साथीदारासह पेट्रोल चोरीसाठी वाहनांचा अपार्टमेंटचा शोध घेत असतो. अपार्टमेंटची पाहणी करुन पकडले जाण्याची भीती नसल्याचे पाहून भिंतीवरुन उडी मारून अपार्टमेंटमध्ये घुसतो आणि नाचत नाचत वाहनांमधून पेट्रोल चोरी करुन पलायन करतो.

नागपूरात डान्सिंग चोराची धूमाकूळ, डान्स करत वाहनांमधील पेट्रोल चोरतो
नागपूरात डान्सिंग चोराची धूमाकूळ, डान्स करत वाहनांमधील पेट्रोल चोरतो
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 6:24 PM
Share

नागपूर : आपण अनेक प्रकारच्या चोरीच्या घटना आतापर्यंत ऐकल्या असतील. घरफोडी, चैन स्नॅचिंग, हातचलाखी, दरोडा अशा अनेक मार्गांनी चोरीच्या घटना घडतात. मात्र नागपूरमध्ये सध्या वेगळ्या चोराची चर्चा सुरु आहे. नागपूरच्या जयताळा परिसरात सध्या या चोराची धूम पहायला मिळते. हा पेट्रोल चोर असून तो पेट्रोलची चोरी करायला जाताना डान्स करत जातो. त्यामुळे या डान्स करणाऱ्या चोराची जोरदार चर्चा आहे. याची पेट्रोल चोरी आणि डान्स सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. (In Nagpur, dancing thieves steal petrol from vehicles while dancing)

पार्किंगमधील दुचाकीतून करतो पेट्रोल चोरी

गेल्या काही दिवसांपासून जयताळा परिसरात पार्किंगमध्ये ठेवलेल्या दुचाकी वाहनांतून पेट्रोल चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिक हैराण आहे. मात्र एका इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये या चोराची करतूद कैद झाली आहे. याबाबत नागरिकांनी पोलीसात तक्रार दिली असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलीस या डान्सर चोराचा शोध घेत आहेत. पहाटेच्या सुमारास हा चोरटा साथीदारासह पेट्रोल चोरीसाठी वाहनांचा अपार्टमेंटचा शोध घेत असतो. अपार्टमेंटची पाहणी करुन पकडले जाण्याची भीती नसल्याचे पाहून भिंतीवरुन उडी मारून अपार्टमेंटमध्ये घुसतो आणि नाचत नाचत वाहनांमधून पेट्रोल चोरी करुन पलायन करतो.

याआधीही या परिसरात घडली होती घटना

याआधीही हा चोरटा जयताळा येथील श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटीमध्ये नाचत पेट्रोल चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. काही दिवसांपासून पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रहिवाशांनी एमआयडीसी पोलिसांत याबाबत तक्रारही केली. सीसीटीव्ही फुटेजही दिले. मात्र अद्यापही पोलिसांना या डान्सर चोराचा शोध लागलेला नाही. (In Nagpur, dancing thieves steal petrol from vehicles while dancing)

इतर बातम्या

अनैतिक संबंधाच्या शंकेने पोखरलं, सूनेसोबत भाडेकरुचं अख्खं कुटंबच संपवलं, 5 जणांच्या हत्येमुळे खळबळ

Gold Monetisation Scheme: आता घरी पडून असलेल्या सोन्यातून कमाईची संधी, जाणून घ्या मोदी सरकारची योजना

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.