स्वत: भरपूर दारु प्यायला, बायकोलाही दारु पाजली आणि मग…. आरोपीचे कृत्य पाहून पोलिसही हादरले

दुसऱ्या दिवशी दाम्पत्य शेतावर आले नाही म्हणून शेतकरी पाहण्यासाठी आला असता समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. शेतकऱ्याने तात्काळ या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना दिली.

स्वत: भरपूर दारु प्यायला, बायकोलाही दारु पाजली आणि मग.... आरोपीचे कृत्य पाहून पोलिसही हादरले
चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 6:15 PM

उमेश पारीक, TV9 मराठी, लासलगाव : संशयाचा कीडा एकदा मनता घुसला की भरला संसार उद्वस्त व्हायला वेळ लागत नाही. मग पती-पत्नीच्या नात्यात विश्वास या शब्दाला काहीच किंमत उरत नाही. संशयामुळे अशीच एक नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात (Nifad taluka Nashik District) उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयातून (Suspicions of Character) पतीने पत्नीला संपवल्याची (Husband Killed Wife) घटना निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द येथे घडली आहे. या घटनेमुळे मानोरी खुर्द सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आशा वास्कली असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रेमा वास्कली असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी आरोपी पतीला अटक ताब्यात घेत त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी आहे दाम्पत्य

प्रेमा आणि आशा हे मूळचे मध्य प्रदेशातील खारगन जिल्ह्यातील रहिवासी असून कामधंद्यासाठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आले होते. दोघेही शेतात मोलमजुरी करुन आपली उपजिविका करत होते.

हे सुद्धा वाचा

मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते

निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द येथील शेतकरी अंबादास शंकर संबेराव यांच्या शेतात मोलमजुरीचे काम करून दोघे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मात्र यादरम्यान प्रेमाच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले. प्रेमा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला.

आरोपीने आधी पत्नीला दारु पाजली, मग संपवले

या संशयातून त्याने पत्नीला आधी दारु पाजली. मग दारूच्या नशेत त्याने पत्नीची गळफास लावून हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. दुसऱ्या दिवशी दाम्पत्य शेतावर आले नाही म्हणून शेतकरी पाहण्यासाठी आला असता समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

लासलगाव पोलिसांकडून आरोपीला अटक

शेतकऱ्याने तात्काळ या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

आरोपीच्या शोधासाठी लासलगाव पोलिसांचे एक पथक येवला येथे रवाना झाले. येवला स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. लासलगाव पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.