Igatpuri Residencial School : निवासी विद्यालयातील विद्यार्थ्याला चटके दिल्याचा पालकांचा आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

कथित चटके दिलेल्या मुलाचे शाळेतील भोजन करतानाचे तीन तारखेचे व्हिडिओ समोर आले असून, त्यात त्याच्या हातावर कुठल्याही प्रकारचे निशाण दिसून येत नाही.

Igatpuri Residencial School : निवासी विद्यालयातील विद्यार्थ्याला चटके दिल्याचा पालकांचा आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
इंदापूरमध्ये पोलिसाच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 7:38 PM

इगतपुरी : इगतपुरी येथील निवासी विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेल्या घटनेला 72 तास उलटत नाहीत तोच एका विद्यार्थ्याचा पालकांनी त्यांच्या पाल्याला अमानुषपणे चटके दिल्याचा आरोप (Allegation) केला आहे. रक्षाबंधनासाठी आपल्या मुलाला घेऊन गेल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला होता. याबाबत शाळा व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता मुलाला डास चावला असेल, असं उत्तर दिल्याचे पालकांनी सांगितले. आता पालकांनी माध्यमांसमोर आपल्या व्यथा मांडल्या असून, याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी (High Level Inquiry) स्थापन करून नेमकं या दिव्यांग विद्यालया (Disability School)त चालले आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिकेने आरोप फेटाळले

शाळेच्या मुख्याध्यापिकेने हे आरोप फेटाळले असून, 9 ऑगस्ट रोजी ह्या विद्यार्थ्याची आजी त्याला घेण्यासाठी आली होती. त्यावेळेस शिक्षिकेने त्यांची सही घेऊन ह्या विद्यार्थ्यास त्यांच्या ताब्यात दिले. आजीने या आरोपातील एकही गोष्ट त्यावेळी सांगितली नाही. घरी गेल्यानंतर जर त्यांना चटके दिल्याचा संशय होता तर त्यांनी तेव्हाच मला फोन करून विचारणा करायला हवी होती की, मुलाबरोबर काय घडलं आहे. मात्र आतापर्यंत एकही फोन आलेला नाही किंवा पालक विचारणा करायला आलेले नाहीत. आता एवढ्या दिवसांनी ते चटके दिल्याचा आरोप करतायत तर या मुलाची वैद्यकीय तपासणी करून घटनेची सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे.

आमच्यावर वेगवेगळे आरोप करून या घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. कोणी या पालकांना चिथावत आहे, काही सांगत आहे. त्या माध्यमातून काही होत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. 9 तारखेपासून आतापर्यंत पालक गप्प का होते आणि ते आताच आरोप का करत आहेत ? त्यामुळे या पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता जाधव यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

वैद्यकीय तपासणीनंतरच डाग कसले ते स्पष्ट होईल

कथित चटके दिलेल्या मुलाचे शाळेतील भोजन करतानाचे तीन तारखेचे व्हिडिओ समोर आले असून, त्यात त्याच्या हातावर कुठल्याही प्रकारचे निशाण दिसून येत नाही. या घटनेसंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी एम बी देशमुख यांच्याशी दूरध्वनवरून संपर्क साधला असता त्यांनी फोटोवरून हे नेमके कशाचे डाग आहेत हे सांगणे मुश्किल असून, त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर नेमके काय आहे ते समजेल, असे सांगितले. (Parents accuse residential school student of torture, demand high-level probe)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.