AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनीमूनच्या रात्री बेडवर पत्नी वाट पाहत बसली, पतीनं केलं असं काही अख्ख गाव हादरलं

नीरज आणि लक्ष्मीचं 11 मे रोजी लग्न झालं होतं. हनीमूनच्या रात्रीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. विशेष म्हणजे दोघांचा प्रेमविवाह झाला होता.

हनीमूनच्या रात्री बेडवर पत्नी वाट पाहत बसली, पतीनं केलं असं काही अख्ख गाव हादरलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2025 | 9:54 PM
Share

प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीचं स्वप्न असतं की, तीचं वैवाहिक आयुष्य हे आनंदी आणि सुखी असावं. लग्न झाल्यानंतर आपन आपल्या पतीचं घर आनंदानं भरून टाकू असा तिला विश्वास असतो. मात्र काही घटना अशा घडतात की क्षणात या स्वप्नाचा चुराडा होतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नुकतंच लग्न झालेली वधू हनीमूनच्या रात्री आपल्या पतीची वाट पाहात होती, मात्र अचानक असं काही घडलं ज्यामुळे क्षणात या तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. जेव्हा घडलेला प्रकार वधुने आपल्या घरी सांगितला तेव्हा तिच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला.

नीरज असं या घटनेतील पतीचं नाव आहे, तर लक्ष्मी असं पत्नीचं नाव आहे. नीरज आणि लक्ष्मी यांचा प्रेमविवाह झाला होता. मधुचंद्राची रात्र होती. त्या दिवशी दोघेही बेडरूममध्ये गेले. त्यानंतर नीरजने लक्ष्मीला मी थोड्या वेळात येतो असं सांगितलं आणि तो रूममधून बाहेर पडला, लक्ष्मी आपल्या पतीची वाट पाहात बसली तर दुसरीकडे नीरजने मात्र गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, या घटनेनं त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे, अख्ख गावं हादरलं आहे. गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

नीरज आणि लक्ष्मीचं 11 मे रोजी लग्न झालं होतं. हनीमूनच्या रात्रीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. विशेष म्हणजे दोघांचा प्रेमविवाह होता. मी थोड्यावेळात येतो असं सांगून निरज घराबाहेर पडला, मात्र तो खूप वेळ झाला तरी देखील घरी परतलाच नाही. म्हणून त्याच्या घरच्यांनी गावकऱ्यांच्या मदतीनं त्याचा शोध घेतला, तो आपल्याच शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. दरम्यान त्याने टोकाचं पाऊल का उचललं याच कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला, ही आत्महत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाहीये.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...