भरारी पथकाची थरारक कारवाई! गोव्याची दारु विकायचा प्लान फसला, सापळा रचून 50 लाखाची अवैध दारु जप्त

याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलंय. महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गोवा राज्य निर्मित आणि फक्त गोवा राज्यात विक्रीला मान्यता असलेल्या विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.

भरारी पथकाची थरारक कारवाई! गोव्याची दारु विकायचा प्लान फसला, सापळा रचून 50 लाखाची अवैध दारु जप्त
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 5:47 PM

येवला : गोवा राज्यात विक्री करता असलेली गोवा (Goan liquor) राज्यनिर्मित विदेशी दारू अवैधरित्या नंदुरबार (Nandurbar) आणि अन्यत्र जात असताना राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. येवला तालुक्यातील सावरगाव येथे सापळा रचून 50 लाख 49 हजार 500 रुपये किंमतीची विदेशी दारू आणि आयशर गाडी जप्त करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलंय. महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गोवा राज्य निर्मित आणि फक्त गोवा राज्यात विक्रीला मान्यता असलेल्या विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. MH43 -BX 0907 या क्रमांकाच्या आयशर गाडी मधून गोव्यातून येवला-मालेगाव मार्गे नंदुरबार आणि अन्यत्र ही विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन जात असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

भरारी पथकाची थरारक कारवाई!

मिळालेल्या माहितीच्या आधारं, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क मुंबई संचालक उषा वर्मा, विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहळे, नाशिक अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही एम पाटील, गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर, येवला येथील निरीक्षक विठ्ठल चौरे आणि दुय्यम निरीक्षक संजय वाकचौरे, योगेश साळवे, नवनाथ सातळकर, अमन तडवी स्टाफ निरीक्षक, नाशिक जयराम जाखोरे यांनी येवला तालुक्यातील सावरगाव हद्दीत असलेल्या हॉटेल मानसच्या समोर येवला-मनमाड रोडवर सापळा रचला. आयशर गाडी येताच यावर ताबा मिळविला. तसंच गाडी ताब्यात घेत झाडाझडती घेतली असता यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या साडेतीनशे बॉक्समध्ये विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त केलेल्या या विदेशी दारूची किंमत जवळपास 50 लाख 49 हजार 500 रुपये इतकी आहे.

कुणाकुणाला अटक?

ज्या आयशर गाडीत ही गोव्याची दारु आढळून आली, त्या गाडीसह गाडीचा चालकालाही ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान, चौकशीअंती आणखीन चौघांना ठाणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. वाहनचालक दिनेश मानाराम बिशनोई-तालवा,ता.नौखा,जिल्हा बीकानेर, गाडीचा मालक प्रदीप नरोत्तम जयस्वाल – हवालदार चाळ, चिंचपाडा एरोली नवी मुंबई, यांसह विश्वास बाबुराव पाटील, हितेश सूर्यकांत रहाटे, रमेशकुमार बिलबलराम बिशनोई यांची आता कसून चौकसी केली जाते आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण करत आहेत.

संबंधित बातम्या :

सायबर चोरट्यांकडून महापालिका आयुक्तांच्या प्रोफाईलचा वापर; आर्थिक मदतीची मागणी ; फसवणुकीला बळी न पडण्याचेआयुक्तांचे आवाहन

तरुणीच्या गळ्यात त्यानं आधी हात घातला, मग चाकूनं वार! बारामतीमधील थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड

कदम रुग्णालयाविरोधात गैरकारभार, अनियमिततेची आरोग्य विभागाची तक्रार, डॉक्टरांविरोधात गुन्हे

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.