‘तो’ शब्द जिव्हारी लागला म्हणून थेट प्राणघातक हल्ला, महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी

आंबेगाव तालुक्यातील अवसरी मंचर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ही घटना घडली आहे. याप्रकरणी मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'तो' शब्द जिव्हारी लागला म्हणून थेट प्राणघातक हल्ला, महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी
महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 5:51 PM

मंचर : येडे वाकडे चाळे करुन फोटो काढू नकोस, असे सांगितल्याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील मंचर येथे उघडकीस आली आहे. या हल्ल्यात सदर विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राहुल आवारी असे हल्ला करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आंबेगाव तालुक्यातील अवसरी मंचर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ही घटना घडली आहे. याप्रकरणी मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयात घडली घटना

राहुल आवारी आणि प्रतिक भोर हे दोन्ही विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. सदर महाविद्यालयात काहीतरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

…म्हणून प्राणघातक हल्ला केला

कार्यक्रमादरम्यान प्रतिक फोटो काढत होता. यावेळी येडे वाकडे चाळे करुन फोटो काढू नकोस, असे राहुलने त्याला सांगितले. मात्र राहुलचे हे बोलणे प्रतिकला अपमानास्पद वाटले.

हे सुद्धा वाचा

यानंतर तुला बघतोच म्हणत बाहेर जाऊन बोललेल्या शब्दाचा राग मनात धरून प्रतिकने कटरच्या साह्याने गळ्यावर, मानेवर, तोंडावर आणि हातावर सपासप वार केले.

यात राहुल जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी रुग्णालयात दाखल होत राहुलचा जबाब घेतला. त्यानंतर राहुल याने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. राहुल आवारी हा खेड तालुक्यातील देव तोरणे गावचा रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो मंचरला राहतो.

हल्लेखोराला कडक शासन करण्याची मागणी

याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. हल्लेखोर विद्यार्थ्याला कडक शासन झाले पाहिजे, तरच अशा घटनांना वेळीच आळा बसेल अशी मागणी पालक आणि विद्यार्थी करत आहेत. दहशत निर्माण करणाऱ्या अन्य मुलांची नावे सांगावी, सांगणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन मंचर पोलिसांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.