संपादक असल्याची बतावणी करुन 4 लाखांचा गंडा, बारामतीत तोतया पत्रकारावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादक असल्याचे सांगून ओएलएक्स आणि इतर ऑनलाईन वेबसाईटवर विक्रीसाठी कारचे फोटो टाकून एका डॉक्टरची फसवणूक करण्यात आली आहे

संपादक असल्याची बतावणी करुन 4 लाखांचा गंडा, बारामतीत तोतया पत्रकारावर गुन्हा दाखल
संपादक असल्याची बतावणी करुन 4 लाखांचा गंडा, बारामतीत तोतया पत्रकारावर गुन्हा दाखल

बारामती (पुणे) : महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादक असल्याचे सांगून ओएलएक्स आणि इतर ऑनलाईन वेबसाईटवर विक्रीसाठी कारचे फोटो टाकून एका डॉक्टरची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी महेश मच्छिंद्र कदम आणि प्रियांका जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला बेड्याही ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार डॉक्टर यांना एक सेकंडहॅण्ड कार खरेदी करायची होती. यासाठी त्यांनी ओएलएक्सवर कार पाहण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांना बारामतीच्या प्रियांका जाधव यांच्या नावावर असलेली कार आवडली. ही कार मारुती सुझुकी कंपनीची वॅगनार होती. ओएलएक्सवर गाडी खरेदी करण्यासाठी आरोपी महेश कदम याचा नंबर होता. तक्रारदार डॉक्टरांनी संबंधित मोबाईल नंबरवर फोन करत माहिती विचारली. आरोपीने आपण एका वृत्तवाहिनीचा संपादक असल्याचं सांगितलं.

पाच लाखांचा व्यवहार

तक्रादार डॉक्टरांना कार खरेदी करायची असल्याने ते बारामतीत आले. त्यांनी गाडीची माहिती घेतली. यावेळी कदमने गाडीचे कागदपत्रे दाखवले. तसेच गाडीची ट्रायलही दिली. त्यानंतर दोघांमध्ये पाच लाखांचा व्यवहार झाला. त्यापैकी चार लाख रुपये हे डॉक्टरांनी त्याच दिवशी दिले. तर उर्वरित एक लाख रुपये गाडी खरेदीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले.

आरोपी कार घेऊन पळाला

तक्रारदाराने प्रियांका जाधव नावाच्या महिलेच्या बँक खात्यात 4 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर तक्रदार आणि साक्षीदाराला गाडीमध्ये बसवून कदमने बारामती येथील नवीन प्रशासकीय भवन शेजारील झेरॉक्स सेंटरमध्ये नेलं. त्याने गाडीच्या व्यवहाराची नोटरी करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळानंतर कदमने तक्रारदार डॉक्टरांना प्रियांका जाधव हिला सही करण्यासाठी घेऊन येतो, असे सांगून त्या ठिकाणावरुन वाहनासह तो निघून गेला. त्यामुळे प्रियांका जाधव आणि कदम या दोघांनी संगनमताने ही फसवणूक केल्याची तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हेही वाचा :

तृतीयपंथींचा धिंगाणा, पैसे न दिल्याने घरात घुसून टीव्ही, फ्रीजची तोडफोड, आई आणि मुलाला मारहाण

बाईकवर तिघं आले, दोघांच्या हातात बंदूक, ज्वेलर्समध्ये शिरताच मोठा गदारोळ, सीसीटीव्हीत थरार कैद

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI