Pune Molestation | सिगारेटचे चटके देत कपडे फाडले, पुण्यात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग

सिगारेटचे चटके देऊन कपडे फाडत तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे

Pune Molestation | सिगारेटचे चटके देत कपडे फाडले, पुण्यात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग
पिंपरीत तरुणीचा विनयभंगImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 11:10 AM

पिंपरी चिंचवड : सिगारेटचे चटके देऊन कपडे फाडत तरुणीचा विनयभंग (Molestation) करण्यात आला. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Pune Crime) आहे. 18 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाण्याचा ड्रम घ्यायचा असल्याचं सांगून तरुण आपल्या घरात शिरला. सिगारेटचा (Cigarette) चटका देत कपडे फाडून आपला विनयभंग करण्यात आला, असा आरोप पीडितेने केला आहे.

काय आहे प्रकरण?

सिगारेटचे चटके देऊन कपडे फाडत तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना पाच एप्रिल रोजी घडल्याची माहिती आहे. तरुणी घरात एकटी असताना अनोळखी तरुण दरवाजात आला. पाण्याचा ड्रम घ्यायचा आहे, असं सांगून घरात घुसला, असा दावा पीडितेने केला आहे.

आरोपीने आपल्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदाराला बोलवले. त्याने तिला सिगारेटचा चटका देत तिचे कपडे फाडले आणि तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

दोघा जणांविरोधात तक्रार

या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

महिला ग्राहकांचे नंबर घेऊन व्हिडीओ कॉल, बायकांनी दुकानात घुसून ‘पुष्पराज’ला फोडला

व्यावसायिकाला लोकलमधील चुंबन महागात पडले; कोर्टाने दिली सक्तमजुरीची शिक्षा

सांगलीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दिरावर गुन्हा, महिलेच्या विनयभंगाचा आरोप

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.