Pune Crime : ‘आई आजारी आहे’ असं म्हणत राज्यातील 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक! पुण्यात गुन्हा दाखल

Pune News : या तरुणाला गुगल पे द्वारे आर्थिक मदत पाठवण्यात आली होती, असं मिसाळ यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

Pune Crime : 'आई आजारी आहे' असं म्हणत राज्यातील 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक! पुण्यात गुन्हा दाखल
पुण्यात गुन्हा दाखल...
Image Credit source: TV9 Marathi
योगेश बोरसे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jul 19, 2022 | 2:17 PM

पुणे : राज्यातील चार महिला आमदारांची (Ladies MLA in Maharashtra) आर्थिक फसवणूक (Financial Fraud) करण्यात आली आहे. आई आजारी असल्याचं कारण देत एका तरुणाने महिला आमदारांकडून पैसे उकळले. मेडिकल आणि हॉस्पपिटलचं बिल देण्यासाठी तरुणानं आमदारांकडे मदतीची याचना केली. आमदारांनीही तरुणावर विश्वास ठेवत त्याला मदत करण्यासाठी पैशांची मदत केली. अखेर या तरुणांविरोधात आमदारानेच तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर आता पुण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल (Pune crime news) करण्यात आला आहे. एकूण चार महिला आमदारांची फसवणूक करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. याप्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांनी पोलिसांना तक्रार दिल्यानंतर अखेर तरुणाविरोघात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.

आर्थिक फसवणूक झालेल्या महिला आमदार कोण?

आमदार माधुरी मिसाळ यांच्या तक्रारीनंतर अखेर आर्थिक फसवणुकीचं हे प्रकरण समोर आलं आहे. आमदार माधुरी मिसाळ यांच्यासोबत देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं सांगितलं जातंय. आई आजारी आहे, असं म्हणत तरुणाने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. सामाजिक बांधिकली जपत आमदारांनीही तरुणाला मदत केली. पण आपली आर्थिक फसवणूक झाली असल्याची तक्रार आता महिला आमदाराच्या वतीने करण्यात आली आहे.

कुणावर फसवणुकीचा आरोप?

मुकेश राठोड नावाच्या तरुणावर आमदार माधुरी मिसाळ यांनी तक्रार दाखळ केली होती. त्यांने आपली आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप मिसाळ यांनी केलाय. फक्त आपलीच नव्हे तर आपल्यासह एकूण चार आमदारांना आर्थिक गंडा घातल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. सध्या पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी आमदार मिसाळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून घेतला असून आता पुढील तपास केला जातोय. आता या तरुणावर नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

पाहा व्हिडीओ : पुण्यातली महत्त्वाची बातमी

हे सुद्धा वाचा

अद्याप या तरुणाला अटक करण्यात आलेली नाही. मात्र या तरुणाला गुगल पे द्वारे आर्थिक मदत पाठवण्यात आली होती, असं मिसाळ यांनी तक्रारीत म्हटलं आहे. आता सायबर पोलिसांच्या मदतीने याप्रकरणी पुढील तपास केला जातोय. संपूर्ण पुणे जिल्ह्यात या आर्थिक फसणुकीप्रकरणावरुन चर्चांना उधाण आलं आहे. जिथे आमदारांची आर्थिक फसवणूक होते, तिथं सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें