AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raghunath Yemul | बायकोच्या छळाला प्रवृत्त करणारा पुण्याचा राजकीय गुरु रघुनाथ येमुल जामिनावर सुटला

ही तुझी बायको म्हणून कायम राहिली, तर तू मंत्री काय, आमदारही होणार नाहीस, तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे" असा सल्ला राजकीय गुरु रघुनाथ येमुलने गणेश गायकवाडला दिल्याचं समोर आलं होतं.

Raghunath Yemul | बायकोच्या छळाला प्रवृत्त करणारा पुण्याचा राजकीय गुरु रघुनाथ येमुल जामिनावर सुटला
रघुनाथ येमुल गुरुजी
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 8:29 AM
Share

पुणे : पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबाला आपल्याच सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक झालेल्या बड्या राजकीय गुरुला जामीन मिळाला आहे. राजकीय गुरु रघुनाथ येमुल (Raghunath Yemul) याला 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर शिवाजीनगर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. बायकोचा पायगुण चांगला नाही, तिच्यामुळे तू आमदार-मंत्री होऊ शकणार नाहीस, असा सल्ला देऊन उद्योजक गणेश गायकवाडला पत्नीचा छ्ळ करायला प्रवृत्त करण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप येमुलवर ठेवण्यात आला होता.

रघुनाथ येमुलच्या विरोधात पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. येमुलच्या विरोधात कुणी तक्रारदार पुढे आल्यास त्याला पुन्हा पोलीस कोठडी देता येऊ शकते, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता.

काय आहे प्रकरण?

उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण केल्या प्रकरणी उद्योजक पती, कुटुंबातील तिघांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 27 वर्षीय पीडित विवाहितेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. जानेवारी 2017 पासून सासरच्या मंडळींकडून आपला छळ होत असल्याचा आरोप तिने केला आहे. अटकेतील आरोपींमध्ये राजकीय गुरु रघुनाथ येमुलचाही समावेश होता.

रघुनाथ येमुलने काय सांगितले?

“तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे, तिची जन्मवेळ चुकीची असून तिचे ग्रहमान दूषित झाले आहे. जर ही तुझी बायको म्हणून कायम राहिली, तर तू मंत्री काय, आमदारही होणार नाहीस, तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे” असा सल्ला गायकवाड कुटुंबाला राजकीय गुरु रघुनाथ येमुलने दिल्याचं समोर आलं होतं.

राजकीय गुरु रघुनाथ येमुल कोण आहे?

रघुनाथ येमुल हा स्वत:ला ‘ज्योतिषाचार्य’ तसेच ‘ध्यानगुरु रघुश्री’ म्हणवून घेतो. त्याने ध्यानगुरु रघुश्री या नावानेच आपली ओळख निर्माण केली. त्याने स्वत:चा नीती संप्रदायही सुरु केला आहे. सोशल मीडियाद्वारे तो रोजच्या दिवसाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त सांगतो. त्याच्याकडून आपला हात पाहण्यासाठी अपॉईटमेंट घ्यावी लागते. त्याच्याजवळ केवळ हात पाहण्यासाठी काही हजार रुपये मोजावे लागतात. हात पाहण्याचा हा कार्यक्रम जवळपास एक तास चालतो. त्यातून तो त्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढतो. रघुनाथ येमुल याने सिद्धी कार्मयोगी फाऊंडेशनची स्थापना केली आहे. तो या फाऊंडेशनचा अध्यक्ष आणि गोसेवा शोध केंद्राचा कन्व्हेअर आहे.

गणेश नानासाहेब गायकवाड कोण आहे?

गणेश नानासाहेब गायकवाड हा पुण्याच्या औंध परिसरात राहतो. तो प्रसिद्ध उद्योजक असून पाषाण आणि बाणेर परिसरात त्याच्या अनेक मालमत्ता आहेत. औंध आणि बाणेर परिसरात त्याने अनेक मॉल, आयटी कंपन्या, दुकाने यांना आपल्या जमिनी, दुकाने, कार्यालये भाडेतत्त्वावर दिली आहेत. यातून गणेश गायकवाड याला दरमहा अडीच ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी त्याने भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पिंपरी-चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप हे गणेश गायकवाड याचे जवळचे नातेवाईक आहेत.

येमुल गुरूजीचे राजकीयपासून प्रशासनातील अधिकार्‍यांशी नजीकचे संबंध

येमुल गुरूजीचे राजकीय क्षेत्रापासून प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांशी नजीकचे संबंध आहेत. आपला हात पाहण्यासाठी अनेक जण गुरूजीच्या दरबारात हजेरी लावतात. त्यामुळे येमुल गुरूजीला अटक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. गुरूजीला अटक केल्यानंतर त्याला ज्या पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे त्याचे भक्त त्याला भेटण्याचा प्रयत्नही करत होते. त्यामुळे या प्रकरणात अंनिसने उडी घेत कारवाईची मागणी केली.

संबंधित बातम्या :

बायकोच्या पायगुणाने मंत्रिपद यायचं नाही, सोडचिठ्ठी दे, पुण्यात बड्या राजकीय गुरुला अटक

पुण्याचा गणेश गायकवाड नेमका कोण आहे जो तथाकथित बाबामुळे चर्चेत आलाय

कोण आहे राजकीय गुरु रघुनाथ येमूल ज्याला नेत्याच्या बायकोनं कोठडीची हवा खाऊ घातलीय?

(Pune Spiritual Political Guru Raghunath Yemul gets bail in abetting a family to harass daughter in law case)

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.