बलात्कार नाही तर, ‘या’ गंभीर कारणामुळे मुलींचा होतोय मृत्यू, गुन्हे विभागाचा थक्क करणारा रिपोर्ट
कुटुंबाजी इज्जत महत्त्वाची की लेकीचा जीव...? बलात्कार नाही तर, एका गंभीर कारणामुळे मुलींचा होतोय मृत्यू, गुन्हे विभागाचा थक्क करणारा रिपोर्ट... जाणून तुम्ही व्हाल हैराण

फसवणूक, अत्याचार, बलात्कार… यामुळे अनेक मुलींनी स्वतःचं आयुष्य संपवलं किंवा त्यांची हत्या करण्यात आली… असं आपण अनेकदा ऐकतो आणि वाचतो… पण एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे, बलात्कार नाही तर सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून अनेक मुलींचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये त्या मुलीची काहीच चूक नसते… सांगायचं झालं तर, पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असताना ग्रेटर नोएडा येथील 28 वर्षीय निक्की हिची पती आणि सासरच्या मंडळींनी हत्या केली. ही हत्या देखील हुंडा प्रकरणामुळे झाली आहे. निक्की हिला आधी मारहाण करण्यात आली त्यानंतर तिला जाळण्यात आलं…
निक्की हिच्या हत्येनंतर संपूर्ण भारतात खळबळ माजली आहे… या घटनेनंतर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर धक्कादायक रिपोर्ट जारी केला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, भारतात हुंडाबळीमुळे प्राण गमावलेल्या महिलांची संख्या 6 हजार 516 आहे. हा आकडा त्या वर्षाचा आहे, जेव्हा बलात्कारामुळे हत्या झालेल्या मुलींच्या तुलनेत हुंडाबळीमुळे हत्या झालेल्या महिलांची संख्या 25 टक्के अधिक आहे.
2022 मध्ये 13 हजार 641 गुन्हे दाखल…
एनसीआरबीने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, समोर आलेली मृत महिलांची संख्या थक्क करणारी आहे. सांगायचं झालं तर, हुंडा घेणं आणि हुंडा देणं भारताच्या कायद्यात मोठा गुन्हा आहे. असं असताना हा गुन्हा मुलींच्या लग्नात सर्रास घडतो…. 2022 मध्ये एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार 13 हजार 641 गुन्हे दाखल झाले. एनसीआरबीच्या नोंदींवरून असं दिसून येतं की बहुतेक महिला परिस्थिती गंभीर होईपर्यंत हुंडाविरोधी कायद्यांची मदत घेत नाहीत, जसे निक्की भाटीच्या बाबतीत झालं.
एका वर्षात किती प्रकरणे निकाली निघाली?
हुंडाबळी सारख्या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास त्यावर न्याय लवकर मिळत नाही… एनसीआरबीचे आकडे सांगतात की, 2022 च्या अखेर पर्यंत कोर्टात 60 हजार 577 हुंडाबळीचे गुन्हे दाखल झाले आहे. त्यामध्या 50 हजार 416 हे 2022 च्या पूर्वीचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये सुनावणी झालेल्या 3 हजार 689 प्रकरणांपैकी फक्त 33 टक्के प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली. या वर्षी हुंडा छळाच्या 6 हजार161 प्रकरणांमध्ये सुनावणी झाली. त्यापैकी फक्त 99 प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली. याचा अर्थ असा की निक्की भाटीला एका वर्षात न्याय मिळण्याची शक्यता 2 टक्कां पेक्षा देखील कमी आहे.
हुंड्याबद्दल सांगायचं झालं तर, 2010 मध्ये का पुस्तकाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की, वधूच्या कुटुंबाचा लग्नाचा सरासरी खर्च वराच्या कुटुंबापेक्षा दीड पट जास्त असतो. चोवीस टक्के कुटुंबांनी हुंडा म्हणून टीव्ही, रेफ्रिजरेटर, कार किंवा मोटरसायकल दिल्याचं पुस्तकात सांगितलं आहे. एका सर्वेक्षणात, 29 टक्के लोकांनी म्हटले की, ‘जर कुटुंबाने अपेक्षित पैसे दिले नाहीत तर महिलेला मारहाण करणं सामान्य आहे.’
