AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेला 7 दिवसांची पोलीस कोठडी, बोठेच्या खिशात सुसाईड नोट!

बाळ बोठेला शनिवारी (13 मार्च) रोजी हैदराबादवरुन अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेला 7 दिवसांची पोलीस कोठडी, बोठेच्या खिशात सुसाईड नोट!
आरोपी बाळ बोठे आणि रेखा जरे
| Updated on: Mar 14, 2021 | 5:10 PM
Share

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाळ बोठेला शनिवारी (13 मार्च) रोजी हैदराबादवरुन अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बाळ बोठेच्या खिशात एक सुसाईड नोट सापडल्याचा खुलासा अहमदनगर पोलिसांनी केला आहे.(Rekha Jare murder accused Bal Bothe kept in police custody till March 20)

बाळ बोठेच्या खिशात सुसाईट नोट!

बाळ बोठेला पकडण्यासाठई पोलिसांनी हैदराबादेत 5 दिवसांचं सर्च ऑपरेशन राबवलं. त्यासाठी पोलिसांनी एकूण 6 पथकं बनवली होती. या काळात बाळ बोठे 3 वेळा पोलिसांना गुंगारा देत पसार झाला होता. आरोपीने आपल्या फोन रात्री बंद केला होता. पोलिसांनी हैदराबादेतील 5 हॉटेलमध्ये त्याचा शोध घेतला. पण अखेर तो 6 व्या हॉटेलमध्ये लपून बसल्याचं पोलिसांना आढळून आलं. दरम्यान, बाळ बोठेच्या खिशात एक सुसाईड नोट सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यात आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख आहे. त्याच बरोबर माझा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर कुणाला संपर्क करावा, याची माहिती त्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘त्या’ तिघांच्या माहितीवरुन बाळ बोठेचा माग

पोलिस अधीक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी पाच विशेष पथके स्थापन केली. हैदाराबादमध्ये बाळ बोठे जिथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्या भागात ही पथकं पाठवण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकले. त्यामध्ये तिघे हाती लागले. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आणि बोठेही पोलिसांच्या हाती लागला.

हॉटेल रुमला बाहेरुन कुलूप

हैदराबादमधील एका हॉटेलमधून बाळ बोठेला अटक केली. इतकंच नाही तर बाळ बोठेला मदत करणाऱ्या इतर पाच जणांनाही पोलिसांनी जेरबंद केलं. विशेष म्हणजे ज्या रुममध्ये बाळ बोठे होता, त्या रुमला बाहेरुन कुलूप लावण्यात आलं होतं. अटकेसाठी पोलिसांनी 5 दिवस विशेष ऑपरेशन केलं. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत कौतुक होत आहे.

काय होती घटना?

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेला रेखा जरे यांच मुलगा रुणाल जरे याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने पाच आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला होता.

संबंधित बातम्या :

Rekha Jare Murder | साडेतीन महिने पोलिसांना गुंगारा, ‘त्या’ तिघांनी तोंड उघडलं नि बाळ बोठे हैदराबादमध्ये सापडला

कॅमेरा, लेखणी ते चाकू, रेखा जरे हत्याकांडातील बाळ बोठे जातेगावच्या घाटात व्हिलन कसा झाला?

Rekha Jare murder accused Bal Bothe kept in police custody till March 20

सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.