भर दिवसा गॅस एजन्सीमध्ये दरोडा, पिस्टलचा धाक दाखवत १ लाख पळवले…

तोंडाला रुमाल बांधून घुसलेल्या दोन अज्ञात चोरांनी कर्मचाऱ्यांना  पिस्टल व चाकू दाखवत १ लाखांची रोकड घेवून पोबारा केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

भर दिवसा गॅस एजन्सीमध्ये दरोडा, पिस्टलचा धाक दाखवत १ लाख पळवले...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 4:38 PM

नाशिक : नाशिकच्या मालेगाव शहरात भर दिवसा गॅस एजन्सीत (Gas Agency) दरोडा पडल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. कलंत्री गॅस एजन्सीमध्ये तोंडाला रुमाल बांधून घुसलेल्या दोघांनी कर्मचाऱ्यांना पिस्टल आणि चाकूचा धाक दाखवत एक लाखांची रोकड घेऊन पोबारा केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात(Nashik) खळबळ उडाली असून गॅस एजन्सीतील दरोडयाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीसांनी (Rural Police) गुन्हा (Crime) दाखल केला असून संशयितांचा शोध सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या सटाणा नाका भागातील कलंत्री गॅस एजन्सीमध्ये दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना घडली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

तोंडाला रुमाल बांधून घुसलेल्या दोन अज्ञात चोरांनी कर्मचाऱ्यांना  पिस्टल व चाकू दाखवत 01 लाखांची रोकड घेवून पोबारा केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

चोरीचा हा सर्व थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असून सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

पाऊस चालू असताना हे दोघे चोरटे दुचाकी वर आले होते. हातात पिस्टल आणि चाकू दाखवत पैशाची मागणी केल्याने एजन्सीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटिव्हीच्या आधारेच पोलिसांना आरोपीचा शोध घ्यावा लागणार आहे.

लुटारू मराठी भाषेत दमबाजी करत असल्याने ते स्थानिक आणि माहितगार असल्याचा पोलीसांना संशय आहे. एजन्सीतील संगणक चालक अजय बाबाजी गोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल असून पोलीसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.